लेख

आजादी के दिवाने भाग १

Advertisement

 

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मुस्लीमांचे योगदान मोलाचे आहे, न खोडता येणारे आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा तठस्थपणे अभ्यास केल्यास कोणीही साक्ष देईल की या स्वातंत्र्य संग्रामाचा ‘जनक’ मुळात मुस्लीम समाजच आहे. परंतु आज मुस्लीम स्वातंत्र्य सेनानींची हत्या केली जात आहे किंबहुना झाली आहे. देशाच्या जडणघडणीतील मुस्लिमांचे योगदान झाकून टाकले गेले आहे. त्यांना अनुल्लेखाने मारून टाकले आहे. मुस्लीम समाजाला स्वतंत्रता आंदोलनातून अश्या प्रकारे वगळण्याचे प्रयत्न चालू आहेत जसे जणूकाही यांचे स्वतंत्रता आंदोलनाशी काहीच घेणेदेणे नव्हते.

वास्तव तर हे आहे की देशाच्या इतिहासात इंग्रजांच्या विरोधात लढणारे पहिले स्वातंत्र्य सेनानी आणि पहिले हुतात्मा सिराजुदौला आणि टिपू सुलतान (अल्लाहची कृपा असो) आहेत. टिपुंच्या बलीदानापासून सुरु झालेला हा खडतर प्रवास मुस्लिमांनी सर्व जातीधार्मियांच्या सोबत राहून किंबहुना पुढे राहून केला. तरीही मुस्लिमांना इतक्या चलाखीने वगळण्यात आले की स्वतः मुस्लीम समाजाला हे षड्यंत्र समजले नाही. परिस्थिती इतकी गंभीर झाली की त्यांना वारंवार आपले देशप्रेम सिद्ध करावे लागत आहे. देशासाठी प्राण अर्पण केलेल्या मुस्लिम पूर्वजांचा इतिहास समोर आणला गेला पाहिजे, जेनेकरून मुस्लिम समाजाला देशप्रेमाचे पुरावे मागणार्यांचे दात त्यांच्या घशात जातील. याद राखा माझे शब्द कोरून ठेवा; जोपर्यंत मुस्लिमांचा इतिहास समोर येणार नाही तोपर्यंत भविष्य सुंदर होणार नाही.

मजलिसे अहरार, वहाबी आंदोलन, खुदाई खिदमतगार, खिलाफत कमेटी, काश्मीर नेशनल कॉन्फ्रेंस, जमिअतुल उलमा, अंजुमने वतन आणि प्रजा कृषक पार्टीसारख्या आंदोलनांनी मुस्लीम समाजातील सर्वसामान्यांना स्वतंत्रता संग्रामशी जोडण्याचे काम केले. इंग्रज शासनाच्या दस्तावेजानुसार मुस्लीम समाजातील बंडखोरांची संख्या २ लाख ७७ हजाराच्या पुढे आहे तर गोळ्या घालून, फाशी देऊन ठार केलेल्यांची संख्या जवळपास ७० हजार आहे. १९३० पर्यंत सीमांत प्रदेशातून ३ हजार, पंजाबमधून ४ हजार, उत्तर प्रदेशातून १० हजार, बिहारमधून ३ हजार, आसाममधून ३ हजार, बंगालमधून ४ हजार, मुंबईमधून ३ हजार तर सिंध प्रांतातून ३ हजार मुस्लिमांना तुरुंगात डांबण्यात आले होते.

Advertisement

महत्वपूर्ण मुद्दा असा आहे की १४०० वर्षाच्या इतिहासात मुस्लीम समाजात जितकेही आंदोलन उभे राहिले त्यांची सुरुवात धार्मिक गोटातून झाली. देशाच्या स्वतंत्रता संग्रामाची सुरुवातही मुस्लीमांच्या धार्मिक गोटातून झाली. प्रसिद्ध धर्म विद्वान सय्यद अहमद बरेलवी (अल्लाहची कृपा असो) यांनी वहाबी आंदोलनाचे बीज रोवले, जे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे संघटन म्हणून उदयास आले. आजची ‘तब्लीग जमात’ याचीच एक शाखा आहे. इस्लामचे प्रसिद्ध भाष्यकार शाह वलीउल्लाह (अल्लाहची कृपा असो) यांनी मुस्लीम समुदायात राजकीय आंदोलनाची बीजे रोवली, त्याची परिणीती पुढे मौलाना मौदुदी (अल्लाहची कृपा असो) यांच्या राजकीय इस्लाममध्ये झाली. शाह इस्माईल शहीद (अल्लाहची कृपा असो) यांनी मुस्लीम समुदायात अंतर्गत सुधारणेची बीजे रोवली, यातून अहले हदीस हा रूढीपरंपरांना फाट्यावर मारणारा पंथ उदयास आला.

मौलाना महेमूद हसन मदनी, मौलाना मोहम्मद मियाँ अन्सारी, मौलाना अबुल कलम आझाद, मौलाना अशरफ अली थानवी, मौलाना सनाउल्लाह अमृतसरी, मौलाना कासीम नानातोई, मौलाना रशीद अहमद गंगोही, सय्यद अहमद सरहिंदी, मौलाना मोहम्मद अली, मौलाना शौकत अली, अल्ताफ हुसैन हाली, मौलाना शिबली नोमानी, डॉ. सैफुद्दीन किचलु, रफी अहमद किडवाईसारखे असंख्य नेतृत्व (अल्लाहची कृपा असो सर्वांवर) मुस्लीम समाजाने या देशाला दिले. त्या सर्वांचा दोष मात्र इतका की हे मुस्लीम होते, यामुळे त्यांना हवा तो प्रकाशझोत स्वतंत्रता नंतरच्या काळात मिळाला नाही. देशासाठी आंदोलन उभे करणारे हे नेतृत्व मागील ६५ वर्षात अनुल्लेखाने मारले जात आहेत.

या व्यतिरिक्त खान अब्दुल गफ्फार खान, अश्फाकउल्लाह खान, गदरच्या संस्थापकांपैकी एक मोहम्मद बरकतउल्लाह खान, सय्यद शाह रहमत, अली अहमद सिद्दिकी फैजाबादी, सय्यद मुज्तबा हुसैन जोनपुरी, अब्दुल कदीर, उमर सुबहानीसारखे (अल्लाहची कृपा असो सर्वांवर) असामान्य प्रतिभेचे क्रांतिकारी मुस्लीम समाजातून झाले. बेगम हजरत महल, असगरी बेगम, हबीबा, जमिला, बेगम जिनत महलसारख्या (अल्लाहची कृपा असो सर्वांवर) असंख्य मुस्लीम महिलांनी आपले योगदान दिले.

 आजादी के दिवाने भाग,२ जरूर वाचा  ,फक्त वाचू नका, शेअर करा. 

लेखक ; मुजाहिद शेख 

 
Share Now

Leave a Reply