ब्रेकिंग न्यूज

इ चलनामुळे वाहतूक पोलीस व नागरिकांचे वाढले ताण

Advertisement

सनाटा प्रतिनिधी ;पुणे शहरातील चौका चौकात उभे राहून नियम   मोडणाऱ्या नागरिकांना अडवून कायदे दाखवणारे वाहतूक पोलीस आज इ चलनच्या पावत्या फाडताना दिसत असले तरी नागरिकानसोबत त्यांनाही या ई चलन नावाच्या मशीन ने कोंडीत अडकविले आहे.म्हणजे ई चलन मशीन जवळ असून नसून खोळम्बा सारखे झाले आहे .अनेक वेळा सर्वर डाऊन झाल्याने पोलिसांना व नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत असून दोघांचेही इतर कामे अडकत असल्याचे चित्र आज पहाण्यास मिळत आहे.

                                              वाचा इतर बातमी .खडक हद्दीतून आणखीन एक गुन्हेगार झाला तडीपार

Advertisement

म्हणजे एक उपाय शोधला पण दोन समस्या निर्माण केल्या.पूर्वी ज्या नागरिकांकडे जवळ पैसे नसायचे त्यांना पोलीस त्यांचे लायसन जमा करून ‘एलटेम’देत होते व त्यावर १ ते १५ दिवसाची मुदत असायची जेव्हा नागरिकाकडे पैसे यायचे तेव्हा ते दंड भरून त्याचे लायसन घेऊन जात होते पण आता एलटेम पण भेटत नाही. ज्या नागरीकाकडे कार्ड नसतील त्या नागरिकांना इतर कामे सोडून पैसे भरण्यासाठी व्होडाफोन स्टोर शोधत फिरावे लागत आहे.वोडाफोन स्टोरस जवळ नसल्याने भाडयाची रिक्षा धरून किंवा मित्र नाहितर नातेवाईकाला बोलावून घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे वोडाफोन स्टोरस मध्ये दंड भरल्यावर आणखीन 3 रूपये 45 पैशयांचा भुरदंड सहन करावा लागत आहे.यामुळे नागरिक व पोलिसात पहिल्यापेक्षा जास्त वाद वाढत असून पुणे वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग म्हणून ऑफलाईन पावती देण्याचे सुरु करण्यात यावे नागरिक व वाहतूक पोलिसांची हेळसांड थांबवावे अशी मागणी लोकहित फौंडेशनचे अजहर अहमद खान यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

Share Now

Leave a Reply