ताज्या घडामोडी

गणेशोत्सव जनजागृतीपर संदेशाच्या ध्वनीफितीचे ५०० मंडळांना वाटप करण्यात आले

Advertisement
सनाटा प्रतिनिधी ; पुणे शहरातील गणेशोत्सव आणखीन सुखमई जावे यासाठी रॉयल ग्रुप ऑफ कंपनीज व रॉयल कार्सचे संचालक प्रफुल कोठारी यांच्यावतीने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा जनजागृती संदेश व वाहतूक विभागाचा जनजागृतीपर संदेशाच्या ध्वनीफितीचे वाटप पुण्यातील  ५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले . 
[su_slider source=”media: 2155,2153,2154″ limit=”5″ width=”1520″ height=”200″ speed=”400″]
या नऊ मिनिटांच्या ध्वनी फितीमध्ये नागरिकांनी घायवयाची काळजी , तसेच अज्ञात वस्तू आढळ्यास त्याबाबत घेण्याची सावधगिरी आणि दक्षता , पाकीटमार आणि साखळीचोरांपासून सावधानता याबाबतची जनजागृतपर माहिती देण्यात आली . हि ध्वनीफित मंडळाच्या आवारात स्पीकरवर सकाळ आणि संध्याकाळ वाजविण्यात येणार .हि ध्वनीफीत पोलीसांमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाटप करण्यात आली . या ध्वनीफितीसाठी पोलिस परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली . यासाठी एस . महेशराव यांनी हि ध्वनीफीत प्रस्तुत केली आहे . अशी माहिती रॉयल ग्रुप ऑफ कंपनीस व रॉयल कार्सचे संचालक प्रफुल कोठारी यांनी दिली .   
 
Share Now

Leave a Reply