ब्रेकिंग न्यूज

पुणेकरांचे दररोज ३ लाख रुपये जाणार पाण्यात.

Advertisement

 

चूक पुणे म,न,पा.अधिकाऱ्यांची : दररोज ३ लाख रु .भुर्दंड भरणार पुणेकर

Advertisement

 पुणे महानगरपालिकेच्या अधिकारींनी घाईघाईने २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारातून उभारले असूनघाईने काढलेल्या कर्जरोख्यांचे व्याज संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी   सजग नागरिक मंच  चे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे . पुण्यातील २४ x ७ पाणी पुरवठाच्या महत्वाकांक्षी योजनेसाठी मागविलेले  टेंडर्स रद्द करण्याची नामुष्की पुणे मनपावर आली . मात्र या योजनेच्या निमित्ताने पुणे मनपाने २०० कोटी रुपयांचे कर्जरोखेशेअर  बाजारातून उभारले आहेत. टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरु झाल्यानंतर खरंतर कर्जरोखे उभारणे आवश्यक होते. परंतु देशातील कर्जरोखे काढणारी पहिली मनपा हा बहुमान मिळवण्याच्या घाईत हे कर्जरोखे अकारण घाई गडबडीत उभारण्यात आले. कर्जरोखे काढले म्हणजे जणू ”सुरतेची लूट” करून आणली आहे, अश्या आविर्भावात या कर्जरोख्यांचा गाजाबाजा करण्यात आला आता नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरु व्हायला ६ ते ८ महिने लागणार आहेत, मात्र दरम्यानच्या काळात या कर्जरोख्यांचे पुणेकरांच्या करांच्या पैश्यातून रोजचे ३ लाख रुपये व्याज भरावे लागणार आहे. आपण सातत्याने पारदर्शक कारभाराची ग्वाही देत असता त्यामुळे हा नावलौकिक टिकविण्यासाठी आपण ह्या अकारण घाईघाईने काढलेल्या कर्जरोख्यांचे व्याज संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांचेकडून वसूल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी   सजग नागरिक मंच  चे विवेक वेलणकर,विश्वास सहस्रबुद्धे, व  पी एम पी एम एल प्रवासी मंच जुगल राठी  यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका पत्रा द्वारे केली आहे . 

 

 
Share Now

Leave a Reply