Homeताज्या घडामोडीपुणे :लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अॅनटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे :लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अॅनटी करप्शनच्या जाळ्यात

सजग नागरिक टाइम्स पुणे प्रतिनिधी: कोंढवा पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्यातील रिपोर्ट पॉझिटिव्ह पाठवण्यासाठी लाच घेतली जात होती.उपनिरीक्षक स्वाती मोरे आणि कर्मचारी हर्षल असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मोरे व हर्षल हे कोंढवा पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी विरूद्ध पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले. दरम्यान या घटनेने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

हेपण वाचा :भररस्त्यात दारुड्याने पोलिसाला चावले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular