ताज्या घडामोडी

पुणे शहरात बनावट नंबरद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई..

Advertisement

 पुणे शहरात बनावट नंबरद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई..
सनाटा न्युज : पुणे शहरात बिनधास्त पणे रिक्षावर बनावट नंबरचा वापर करून रिक्षात प्रवासी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक पोलीस उपायुकत अशोक मोराळे यांच्या आदेशाने मार्केटयार्ड , गंगाधाम परिसरात स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक एस बी पाचोरकर, व ईतर कर्मचारी मिळून काळ्या पिवळ्या रंगाची प्रवासी वाहतूक करणारी वाहने थांबवून त्यांची कागदपत्रे चेक करत असताना रिक्षा क्र MH 12 R 4103, MH 12 UA 4056 यांना चौकशी साठी थांबवले असता तसेच सदरील रिक्षांचे कागदपत्रे मागितली असताना रिक्षा चालकां  जवळ कोणते हि कागदपत्रे नव्हती वाहतूक पोलीसांना संशय असल्याने त्यांनी एका रिक्षांची चासी नंबर व इंजन नंबर चेक केला असता खाडाखोड झाल्याचे आढळून आले पुणे RTO कडे खातरजमा केली MH 12 UA 4056 हा क्र. जीपचा असल्याची माहिती मिळाली तसेचं MH 12 R 4103 या रिक्षाची माहिती मिळून आलेले नाही
सदर प्रकरणाचा तपासासाठी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे वेगवेगळे दाखल करण्यात आले असुन पुढिल तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक मार्केटयार्ड पो .स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..

Share Now

Leave a Reply