ब्रेकिंग न्यूज

भाजपच मेघालयात आयोजित करणार बीफ पार्टी.

Advertisement

 

ईशान्य भारतात भाजपच्या बीफ बंदीच्या निर्णयाला पक्षांतर्गत विरोध होताना दिसत आहे .मेघालयातील भाजप नेत्यांचा  या निर्णयाला आक्षेप आहे .गुरांच्या कत्तलीसाठी विक्री वर बंदी आणण्याची अधिसूचना केंद्र सरकारने काढली असून .याला विरोध म्हणून मेघालयातील भाजपचाएक  नेता मोदि सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बीफ पार्टी देण्याच्या तयारीत असून मोदि सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने गारो हिल्स मध्ये “बीची बीफ पार्टीचे ”आयोजन करणार असल्याची पोस्ट उत्तर गारो हिल्स जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष बाचू चाम्बुगांग मारक यांनी त्यांच्या स्वताच्या फेसबुक अकाऊट वर केलीआहे (तांदळाच्या बियरला बीची म्हणतात )अशी पोस्ट केल्यामुळे बाचू चाम्बुगांग मारक यांना भाजपातून निलंबित करण्यात येणार असल्याचे मेघालयाचे पक्षप्रभारी नलिनी कोहलींनी सांगितले .तर बाचू चाम्बुगांग मारक यांनी”द टेलिग्राफला  सांगितले कि आम्ही बीफ पार्टीचे आयोजन करणार आहोत . बीफ हे आमचे पारंपारिक खाद्य असून आम्ही गारो समाजाचे लोक बीफ खाल्या शिवाय राहू शकत नाही. पक्षनेतृत्वाने बीफ बंदीवर मार्ग काढला तर ठीक आहे . नाहीतर  आम्हीच पक्ष सोडण्याच्या तयारीत आहोत.जर पक्षाने बीफ बंदी केलीच तर गारो हिल्स मध्ये पक्षाला कोणताच पाठींबा मिळणार नसून आमचा त्याला विरोधच राहील असे  बाचू चाम्बुगांग मारक यांनी सांगितले .

 

Share Now

Leave a Reply