ब्रेकिंग न्यूज

वानवडी वाहतूक पोलिसांची चालू आहे जोरदार कारवाई

Advertisement

पुणे :पुणे शहरात दिवसें दिवस आय टी हब व व्यवसायात वाढ होऊन नागरिकांच्या गरजाही दिवसें दिवस बदलत आहे एके काळी पुणे शहराला  सायकली व पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जायचे व त्यानंतर मोटरसायकल धारकांची संख्या
वाढत गेल्याने मोटरसायकलींचे शहर म्हणून ओळखले जात पण आता मोटरसायकलींची जागा मोटरकारने घेतली असून या मोटरकारने अनेकांच्या समस्याही सोडवल्या असून अनेकांनी याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून अनेकांचे जीवन उध्वस्तहि केले आहे.मोटर कारचे काचा हे पारदर्शक असावे असे कोर्टाचे  आदेश असूनही अनेक मोटरकारवर निळ्या ,काळ्या रंगाच्या टेनटेड ग्लास लागलेले आहे .अश्या टेनटेड ग्लास लागलेल्या कारवर सध्या वाहतूक पोलिसांची कारवाई चालू असून वानवडी वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही दिवसात २०० च्या आसपास कारवर कारवाई करून इ चलन द्वारे दंड वसूल करण्यात आले आहे हि सर्व कारवाई वानवडी वाहतूकीचे पोलीस निरीक्षक -जे,एस,पठाण ,पोलीस उपनिरीक्षक-आर.बी.रोकडे व याच्या कर्मचारींनी मिळून केली असल्याची माहिती मिळाली .

Share Now

Leave a Reply