ब्रेकिंग न्यूज

सिग्नलवरील एल ए डी होर्डींगमुळे होत आहे अपघात .

Advertisement

एल ए डी होर्डींग परवानगी विनाच लागलेत सिग्नलच्या चौका चौकात.
आज पुणे शहरामध्ये अनेक गजबजलेल्या ठिकाणी एल ए डी इलेक्ट्रॉनिक जाहिरात लावली जात आहे त्या जाहिराती साठी पुणे महानगर पालिकेतील आकाश चिन्ह विभागाची.. तर ना हरकत प्रमाण पत्र वाहतूक शाखे कडून दिल्या शिवाय परवाना आकाश चिन्ह विभागाकडून दिला जात नाही
वाहन चालविताना वाहन चालकाचे लक्ष विचलित होणार नाही ह्या अटीवर NOC दिली जात असली तरी आज सरासर एल ए डी जाहिरातदारांन कडून सिंग्नल च्या चौकातच लावल्या जात असल्याने वाहन चालकाचे लक्ष विचलित होऊन अनेक चौकात अपघात झाल्याचे दिसुन येते .याची माहिती लोकहित मोटरसायकल संघटना चे अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी वाहतूक शाखेला माहिती अधिकारात माहिती मागितलेली होती *त्या उत्तरात वाहतूक शाखेने म्हण्टले आहे कि सिग्नल च्या मेन चौकात अडथळा अथवा अपघात होईल अश्या ठिकाणी वाहतूक शाखेकडून इलेक्ट्रॉनिक जाहिरातीना ना हरकत प्रमाण पत्र दिले जात नाही व तसेच आकाश चिन्ह विभाग ने किती LED ची तपासणी केली आहे याची माहिती घेतली असता एक हि तपासणी झाली नसल्याने माहिती अधिकारात कळविले आणि विषेश महणजे मध्यरात्री नंतर सदरील सर्व एल ए डी इलेक्ट्रॉनिक जाहिरात बंद करणे बंधनकारक असताना हि काहि LED सुरूच असल्याचे दिसते यावर मात्र आकाश चिन्ह व पुणे शहर वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे ..⁠⁠⁠⁠
मग बहुतेक ठिकाणी सिग्नलच्याच चौकात एल ए डी इलेक्ट्रॉनिक जाहिरात लागलेच कसे काय ?
सदरील इलेक्ट्रॉनिक जाहिराती मुळे वाहन चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होत असल्याने वाहतूक विभागाकडून तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी लोकहित मोटरसायकल संघटना चे अजहर अहमद खान यांनी केली आहे..

Advertisement

Share Now

Leave a Reply