पुणे शहरातील मुंढवा,कोंढवा,हडपसर, लोणी काळभोर, बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिमंडळ-५ मधील एकूण १० सराईत गुन्हेगारांना एकाच वेळी पुणे शहरातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ-५चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तडीपारीचे आदेश दिले आहेत.
प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २०, रा. लोखर भोर), चंद्र ऊर्फ चंद्रकांत दाजी चोरमले (वय २३, रा. लोणी काळभोर),फिरोज महंमद शेख (रा. कदमवास्ती), अजय दीपक जाधव (वय ३५, रा. मुंढवा), हनुमंत दगडू सरोदे (वय ४८, रा. मुंढवा), साहिल राजू साठे (वय १९, रा. मुंढवा), वसीम सलीम पटेल (वय ४०, रा. कोंढवा), ओंकार शिवानंद स्वामी (वय २३, रा.बिबवेवाडी),
वसीम शकील खान (वय २५, रा. कोंढवा), आदिराज मनोज कामठे (वय २१, रा. हडपसर) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारहाण, धमकावणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दहशत निर्माण करणे, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे,खुनाचा प्रयत्न,बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे, दरोडा तयारी, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.