Homeताज्या घडामोडीइन्साफ तर करावा लागेल

इन्साफ तर करावा लागेल

24 Ramzan-ul-Mubarak  :पवित्र रमजान महिन्याची आज येणारी पंचविसावी रात्र ही लैलतुल कद्र पैकी एक आहे.

24 ramzan ul mubarak,The twenty-fifth night is one of laylatul qadr

24 Ramzan-ul-Mubarak : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्याची आज येणारी पंचविसावी रात्र ही लैलतुल कद्र पैकी एक आहे.

ती शब ए कद्र सुद्धा असू शकते असे धार्मिक ग्रंथातही म्हटले आहे .

आजच्या रात्रीसुद्धा जास्तीत जास्त प्रार्थना, इबादत, अल्लाहचे नामस्मरण करून शक्य होईल तेवढे पुण्य आपल्या नाम ए आमाल मध्ये दर्ज करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे .

इस्लाम धर्मामध्ये न्याय म्हणजे इन्साफ ला फार महत्व दिले आहे.

अल्लाहचा महिना – रमजान

जोपर्यंत या जगामध्ये प्रत्येक बाबतीत न्याय केला जात होता तोपर्यंत जगाचा गाडा चांगल्याप्रकारे चालला होता.

परंतु जेव्हापासून न्यायदानात अन्याय होऊ लागला, तेव्हापासून जगाची विनाशाकडे वाटचाल सुरू झाली. असे संकेत जगाच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात.

हजरत पैगंबरांनी प्रत्येक बाबींमध्ये न्याय करा अशी शिकवण दिली आहे. अन्याय करणारांना अल्लाह कधी माफ करीत नाही.

जेव्हा मानव जात एकमेकाशी न्याय करीत नाही तेव्हा या सृष्टीचा निर्माता स्वतः न्यायदान करतो. यातूनच भगवान के घर देर है अंधेर नही है असे म्हटले जाते.

सचोटी आणि न्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेथे सत्य आहे तेथे न्याय आहे. जेथे असत्य आहे तेथे अन्याय आहे.

पावित्र्याचा परिपाक -रमजान

प्रत्येक क्षेत्रामध्ये न्यायदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.इस्लामचे दुसरे खलिफा आणि हजर पैगंबरांचे एक विश्वासू सहकारी हजरत उमर बिन खत्ताब

( रजि अल्लाह तआला अन्हू ) उर्फ हजरत उमर फारूक यांचे व्यक्तिमत्व इस्लामी ईतिहासाचे एक महत्वपूर्ण अंग आहे.

जेव्हा हजरत पैगंबरांनी इस्लामची शिकवण लोकांना देण्यास प्रारंभ केला. त्या वेळी मक्कामध्ये जे लोक पैगंबरांचे विरोधी होते, त्यामध्ये हजरत उमर फारूक हे सुद्धा एक होते.

त्यांना जेव्हा कळाले कि आपल्या बहिणीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे व ती कुरआन पठण करीत आहे. तेव्हा रागामध्येच तलवार घेऊन ते बहिणीला मारण्यासाठी निघाले.

जेव्हा ते बहिणीच्या घरात पोहोचले तेव्हा त्यांची बहीण कुरआन ची तिलावत करीत होती .क्रोधाने तापलेले उमर घरात पोहोचले.बहिणीचा आवाज ऐकून थबकले.

कयामत कधी येईल?

कुरआनमधील शब्द कानी पडताच तलवार हातातून गळून पडली.

त्या शब्दांमध्ये अशी काही जादू होती कि उमर सुद्धा मुसलमान झाले आणि एकेकाळचे पैगंबरांचे कट्टर विरोधक आता कट्टर अनुयायी बनले .

हजरत पैगंबरांना त्यांनी मनापासून साथ दिली .त्यांचा विश्वास संपादन केला.एक न्यायप्रिय व्यक्तिमत्व म्हणून हजरत उमर यांची इतिहासात नोंद झाली आहे.

त्यांच्याबद्दल हजरत पैगंबरांनी म्हटलं आहे की माझ्या नंतर जर कोणी प्रेषित असता तर तो उमर असता. यावरून हजरत उमर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो.

शेवटचा अशरा मुक्तीचा

खलिफा म्हणजे बादशहा. दुसरे खलिफा झाल्यानंतर हजरत उमर यांनी इस्लामी राजवटीचा कारभार अत्यंत चांगल्या प्रकारे केला. खूप सुधारणा केल्या.

न्यायपालिका निर्माण केली.जनतेच्या हितासाठी स्वतः वेषांतर करून लोकांची खबर गिरी घेत. त्यांच्या गरजा पूर्ण करीत.

न्यायदानामध्ये वशिलेबाजी हा प्रकार त्यांनी कधी होऊ दिला नाही. स्वतःच्या मुलाने केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून त्याला इतके कोडे मारले कि तो गतप्राण झाला.

पण त्यांनी कधी पश्चाताप व्यक्त नाही केला. न्याय म्हणजे न्याय ही त्यांची धारणा होती. कयामतच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे न्याय न होणे हे आहे.

आज जगात आपण पाहतो न्याय सुद्धा विकला जात आहे. न्यायाधीश विकले जात आहेत. सत्तेच्या दबावापुढे न्यायाऐवजी अन्याय केला जात आहे.

महत्वपूर्ण दिन – शुक्रवार (24 Ramzan-ul-Mubarak )

लाभाच्या पदासाठी न्याय दिला जात आहे. हे सर्व कयामतचेच लक्षण आहे. न्यायदान करणाऱ्यांनी आपली विश्वासार्हता टिकविणे गरजेचे आहे .

हजरत उमर यांच्या राजवटीतील न्यायदानाचे अनेक किस्से इतिहासामध्ये अजरामर झाले आहेत .स्वतःच्याविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी देणारे ते खलीफा होते .

बावीस हजार मैल क्षेत्रफळावर विस्तारलेल्या इस्लामी राजवटीचा हा शासक स्वतः मात्र थिगळं लावलेले कपडे परिधान करीत होता .

त्यांनी मनात आणलं असतं तर दहा लाख रुपयाचा सुट सुद्धा परिधान करू शकले असते .

परंतु जनतेचा पैसा स्वतःवर खर्च करायचा नाही हे इस्लामी राजवटीचे तत्व असल्यामुळे या तत्त्वाचे पालन करीत एक वेळ उपाशी राहिले.

मात्र बैतुलमाल म्हणजे शाही खजिन्यातून स्वतःसाठी कधी खर्च केला नाही.प्राप्त अधिकाराचा दुरुपयोग कधी केला नाही.

नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार

उलट ही आपली जबाबदारी असून उद्या कयामतच्या दिवशी आपल्याला खलिफा म्हणून केलेल्या

कारभाराचा हिशोब द्यावा लागेल आणि आपण तो देऊ शकतो का या विचाराने रडत असत. कुणावर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत.

शासकीय कामकाजामध्ये कुठेही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सक्षम अशी यंत्रणा त्यांनी निर्माण केली. त्यामार्फत आदर्श असा कारभार केला.

इस्लामी राजवटीमध्ये त्यांचे योगदान हे अविस्मरणीय आहे. यावर्षीची ईद साधेपणाने साजरी करण्या बाबत आत्तापर्यंत खूप जागृती झाली आहे.

त्यामुळे कोणीही नवीन कपडे खरेदी करू नये. महिलांनी सुद्धा नवीन खरेदी टाळावी. अशा प्रकारचे आवाहन समाजाच्या सर्व थरातून केले जात आहे. ,

त्याला आपण सर्वांनी उत्तम असा प्रतिसाद द्यावा. ईदसाठी खर्च होणारी रक्कम आपल्या गोरगरीब बांधवांसाठी, देशवासियांसाठी खर्च करावी .

दिव्य कुरआन – मार्गदर्शक

गरजूंची मदत करावी. कारण आज परिस्थिती भयंकर आहे. सर्वांना मदतीची गरज आहे. तेव्हा यामध्ये आपलेही योगदान असावे .

जीवनातील एक अविस्मरणीय अशी ईद यावर्षी आपण साजरी करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी सादगीने या वर्षीची रमजान ईद साजरी करण्याचा संकल्प करू या.

अल्लाहतआला सर्वांना सुबुद्धी देवो. कोरोना पासून समस्त मानवजातीचे रक्षण करून लवकरात लवकर या रोगापासून जगाची मुक्तता होवो .आमीन . ( क्रमशः)

सलीमखान पठाण
9226408082.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular