26-Ramzan-ul-mubarak : शब ए कद्र या एका रात्रीचे पुण्य ८३ वर्षे चार महिन्याएवढे आहे
26-Ramzan-ul-mubarak :पवित्र रमजान महिन्याची आज येणारी सत्ताविसावी रात्र ही शब ए कद्र म्हणून सर्व परिचित आहे.
लैलतुल कद्र च्या पाच रात्री पैकी एक असलेली (26-Ramzan-ul-mubarak )शब ए कद्र ही २७ तारखेची रात्र असते या श्रद्धेने ती सर्वत्र साजरी केली जाते .
तशी आता लोकजागृती निर्माण झाल्यामुळे २१, २३ आणि २५ तारखेच्या रात्री सुद्धा लोकांनी जागुन शब ए कद्र शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
२९ तारखेची एक रात्र ही अद्याप बाकी आहे .
अल्लाहच्या मर्जीसाठी दान
या रात्रीत केलेल्या प्रार्थनेचे पुण्य एक हजार महिन्यांच्या पुण्या एवढे असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या नाम ए आमाल मध्ये हे पुण्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो .
सुरुवातीच्या काळात ज्यावेळी सृष्टी निर्माण झाली. हजरत आदम अलैसलाम यांच्यापासून पृथ्वीतलावर मानव अल्लाहने निर्माण केला.
त्या काळातील लोकांचे वय आजच्यापेक्षा खूप जादा होते. हजार, नऊशे ,सातशे ,पाचशे ,तीनशे अशा वयाची माणसे त्या काळात होती.
कयामतच्या दिवशी तर सृष्टीमध्ये आजपर्यंत अस्तित्वात आलेले सर्व मानव गोळा होणार आहेत. मग ज्यांची वये जास्त आहेत.
सहाजिकच त्यांचे पुण्य सुद्धा जादा असणार आणि मग आजची शंभरीच्या आतील वय असणारी माणसं त्या पुण्याची बरोबरी कशी करणार ?
म्हणून अल्लाहतआला ने रमजानमध्ये शब ए कद्र चे अस्तित्व निर्माण केले. या एका रात्रीचे पुण्य ८३ वर्षे चार महिन्याएवढे आहे .
एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात दहा रात्री जरी प्राप्त झाल्या तरी त्याचे पुण्य ८३० वर्षाचे होईल आणि मग तो पूर्वीच्या लोकांची बरोबरी करू शकेल.
तेव्हा प्रत्येकाने ही रात्र शोधण्याचा प्रयत्न करावा .इस्लामचे चौथे खलिफा हजरत अली इब्ने अबीतालीब (रजिअल्लाह ताअला अन्हू ) होते .
नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार
ते हजरत पैगंबरांचे चुलत भाऊ तसेच जावई सुद्धा होते.अत्यंत बलशाली असं ते व्यक्तिमत्व होतं .ज्ञानाच्या बाबतीत ही ते कुशाग्र बुद्धीचे होते.
हजरत पैगंबर त्यांच्याबाबतीत म्हणत असत कि मै इल्म का घर हु और अली उसका दरवाजा .
खलिफा झाल्यानंतर हजरत अली यांनी इस्लामी राजवट अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळून एक आदर्श निर्माण केला. आपल्या ज्ञानाने त्यांनी समाज जागृती केली.
धर्मासाठी कोणत्याही प्रकारचे बलिदान देण्याची त्यांची तयारी होती. धार्मिक लढाईसाठी ते सदैव तयार असायचे. म्हणून त्यांना खुदा का शेर म्हणतात.
ज्यावेळी हजरत पैगंबरांनी मक्केहून मदिनेला हिजरत केली. त्यावेळी रात्री आपल्या बिछान्यावर त्यांनी हजरत अली यांना झोपवले होते.
विरोधक ज्या वेळी हजरत पैगंबरांना शोधायला त्यांच्या घरी आले. तेव्हा तेथे हजरत अली यांना पाहून विरोधकांची भांबेरी उडाली होती .
कुरआन ए पाकचा संदेश
यावर्षी ईद साधेपणाने साजरी करण्याबाबत वारंवार जागृती केली जात आहे. मात्र लहान मुलांचा आनंद हिरावला जाणार नाही याचीही दक्षता आपल्याला घ्यायची आहे.
शहरातील मार्केट चालू करण्याचे प्रयत्न होत आहेत. तेथे गर्दी करून आपली बदनामी होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी.
कारण चुका दुसऱ्यांनी करायच्या आणि खापर आपल्यावर फोडायचे अशी प्रथा सध्या देशात रुढ झालेली आहे . तेव्हा काळजी घ्या (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082