ताज्या घडामोडीपुणे

रेमेडेसिव्हर वापराविना ९१ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात !

Advertisement

(91 year old grandfather) टाळ्यांच्या गजरात कोविड सेंटरमधून ज्येष्ठ नागरिकांना डिस्चार्ज !

( 91 year old grandfather) sajag nagrik times

पुणे : रेमेडेसिव्हरचा तुटवडा असल्याने त्याच्या वापराशिवाय साई स्नेह कोविड सेंटर मधे उपचारानंतर पूर्ण बरे होऊन,

वसंतराव पिसाळ ( वय ९१ ) आणि सुचेता केसरकर ( वय ७१ ) या ज्येष्ठ नागरिकांना एकुण ६ रुग्णांना आज (मंगळवारी ) दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.

91-year-old-grandfather-overcomes-corona-without-using-remdesivir

साईस्नेह कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमीत जगताप , येथील वॉर्डबॉय,

परिचारिका यांनी टाळया वाजवत , नातेवाईकांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त डिस्चार्ज दिला आणि घरी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या .

कात्रज घाटात हॉटेल रॉयल येथे हे साई स्नेह कोविड सेंटर आहे. व्हेंटीलेटर बेड वगळता अन्य सर्व सुविधा येथे आहेत.

४० कोविड रुग्णांवर उपचाराची सुविधा येथे आहे.

येथे उपचारासाठी दाखल झालेल्या आणि कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी डॉ. सुनील जगताप म्हणाले, ‘ कोविड साथीची परिस्थिती असाधारण आहे.

Advertisement

खासगी कोविड उपचार केंद्रे परिस्थितीची हाक ऐकून प्रतिकूल परिस्थितीत उभी करण्यात आली.

साई स्नेह कोविड सेंटर हे हॉटेल रॉयल चे रुपांतर हॉस्पिटल मध्ये करून उभारण्यात आले.

योगायोगाने येथे कार्यरत डॉ. सुमीत जगताप यांचा आज वाढदिवसही होता.

त्यांनी कोविड रूग्णांवर उपचार करीत असल्याने सुटी न घेता बऱ्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन हा संस्मरणीय दिवस साजरा केला.

वसंतराव पिसाळ,नितीन बांदल, निता सूर्यवंशी, रवींद्र गोळे, सुचिता केसरकर, संदीप निगडे या ६ कोविड रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

या रुग्णांना प्रोटोकॉल नुसार , आयसीएमआर गाईडलाईन नुसार उपचार करण्यात आले ,

रक्त पातळ होण्याची औषधे देण्यात आली.अँटी फंगल ट्रीटमेंट देण्यात आली.

१५ एप्रिलला हे सेंटर सुरु झाले. येथे ८० रुग्ण दाखल होऊ शकतात.

त्यातील ४० जणांना ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करुन देता येते.

कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर नातेवाईकांना एरवी नीट माहिती मिळत नाही.

नातेवाईकांना रुग्णाच्या प्रगतीची माहिती देण्याची , समुपदेशनाची खास सुविधा आम्ही उपलब्ध करुन दिली आहे, असे डॉ. सुनील जगताप यांनी सांगितले

Share Now