Homeताज्या घडामोडीतीन तलाकच्या गुन्ह्यात महाराष्ट्रात पहिलाच जामीन मंजुर

तीन तलाकच्या गुन्ह्यात महाराष्ट्रात पहिलाच जामीन मंजुर

Bail granted Triple Talaq case:तीन तलाकच्या गुन्ह्यात महाराष्ट्रात पहिलाच जामीन मंजुर

bail-granted-for-in-triple-talaq-case-first-time-in-maharashtra 2019

Bail granted Triple Talaq case : सजग नागरिक टाइम्स :तीन तलाकच्या संदर्भात आलेल्या नवीन कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात

महाराष्ट्रात पहिलाच जामीन ऍड. एस. एम. कोतवाल (Adv.S.M.Kotwal) यांनी लातूर जिल्ह्यात घेतला आहे,

सुमारे 40 वर्षाच्या दीर्घ संसारात अनेकदा भांडणे आणि तक्रारी करून झाल्यानंतर आता ही नवीन कायद्यानुसार

नवऱ्याने तीन तलाक दिल्याची ताजी तक्रार फिर्यादी पत्नीने दिली होती,कायद्यातील सरकारच्या दाव्यानुसार महिलांना न्याय देणाऱ्या तरतुदी प्रमाणे

नवऱ्याने तलाकचा उच्चार केला हे साबीत(सिद्ध) करण्याची जबाबदारी पत्नीवर होती,आणि ती तश्या प्रकारचा थेट पुरावा सादर करू शकली नाही,

तर आरोपी नवऱ्याने पत्नीने वेळोवेळी दाखल केलेल्या विविध तक्रारी सादर करून तिची आरोप लावायची जुनी सवय असल्याचे

तसेच तो स्वतः म्हातारा असून अनेक आजारांनी ग्रस्त असल्याची कागदपत्रे सादर केली,व त्याने तलाक चा शब्द देखील उच्चारला नव्हता असे नमूद केले,

सरकार तर्फ़े आरोपी साक्षीदार आणि फिर्यादीवर दबाव आणून पुरावा नष्ट करेल अशी भूमिका घेत जामिनाला विरोध करण्यात आला,

पण न्यायालयाने तो फेटाळून लावत ऍड. एस. एम. कोतवाल यांचा युक्तिवाद मान्य करत आरोपी पतीला जामीन मंजूर केला.

हेपण वाचा :तलाक सभी जायज चीजो मे सब से गंदी और गलीज चीज है

नवरा बायको दोघांना न्याय देऊ न शकणाऱ्या विचित्र कायद्यात महाराष्ट्रात पहिला जामीन मिळवल्याबद्दल ऍड एस एम कोतवाल यांचे अॅड.समिर शेख व फिर्यादी ने अभिनंदन व्यक्त केले.

आणि निकालाची प्रत दिल्या बद्दल आभार, व पुढेही असेच न्यायासाठी काम करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा ही दिल्या.

सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिले गेले आहे,तिथे हा कायदा आहे तश्या स्वरूपात टिकेल असे वाटत नाही,

पण टिकला तर ही न्याय मिळवून द्यायची लढाई मोठी आणि व्यापक स्वरूपात लढावी लागेल असे वाटत असल्याचे अॅड.समिर शेख म्हणाले.

हेपण वाचा :विवाह बंधन नव्हे एक करार आहे

हेपण वाचा :जगातील विविध धर्म आणि संस्कृतीमध्ये विवाह एक पवित्र बंधन किंवा एक पवित्र नाते आहे.

(Islam) इस्लाम जगातील सर्वात शेवटचा आणि आधुनिक संदेश असल्याने त्याला ही भूमिका मान्य नाही.इस्लामने विवाह संस्थेत कित्येक आमूलाग्र बदल केले.

त्यापैकीच एक मुलभूत बदल म्हणजे त्याने विवाहाच्या पवित्र बंधन असण्याच्या संकल्पनेवरच घाव घातला आहे.

(Islam) इस्लाम विवाहाला एक बंधन नव्हे तर एक करार मानतो.

इस्लामने केलेल्या या बदलांना समजण्यापूर्वी आपल्याला विवाह संस्कृतीचा संक्षिप्त इतिहास पाहावा लागेल..अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular