ताज्या घडामोडीपुणे

प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या नूपुर शर्मा विरोधात गुन्हा दाखल.

Advertisement

नूपुर शर्माला लवकरात लवकर अटक करण्याची मुस्लिम समाजाची मागणी .

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : भाजपाच्या नूपुर शर्माने काही दिवसांपूर्वी एका डिबेट दरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल बेताल वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजामध्ये सध्या रोष असून नुपूर शर्मा विरोधात देशभरात मोर्चे , आंदोलने चालू आहे .

तर पिंपरी पोलिस ठाण्यात नुपूर शर्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Advertisement

सदरील तक्रार इम्रान युसुफ शेख यांनी केली आहे . नुपूर शर्माने एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती मध्ये बोलता बोलता तिने प्रेषितांबद्दल चुकिचे वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजातर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे .

भाजपाच्या नुपूर शर्मा विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम १५५ अ, १५५ ब ,२९५ अ,५०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात. आला आहे . पुढील तपास पिंपरी पोलिसांकडून चालू आहे .

Share Now