मानसिक विकृतीची अनेक उदाहरणे अनेकदा समोर येत असतात. यातील काही उदाहरणे म्हणजे अगदी किळसवाणी आणि संताप निर्माण करणारी असतात. लैंगिक विकृतीने कळस गाठला असून ‘लिंगपिसाट’ कधी काय करतील याचा नेम राहिलेला नाही.त्याचाच प्रत्यय हडपसरमधील एका घटनेने आला असून या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. एका विकृत व्यक्तीने श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलीमुद्दीन शेख (रा. हांडेवाडी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहण्यास आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुत्री पाळीव आहे. तिचा मालक कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता. त्यावेळी आरोपीने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार के ले. कुत्रीचा मालक घरी आल्यानंतर तिच्या वागणुकीमध्ये त्यांना अचानक बदल जाणवू लागले. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी घरामधील
सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी हा घृणास्पद प्रकार प्रकार समोर आला. या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली आहे.कुत्रीच्या मालकाने या घटनेची
माहिती शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह स्थानिक नागरिकांना दिली. पळसकर आणि नागरिकांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहे.