ताज्या घडामोडी

अंगडशहा तकिया येथील वक्फ मालमत्तेवरील अतिक्रमणावर अखेर कारवाई

Advertisement

Waqf property : राजकीय कार्यकर्त्याने मारला होता ताबा

action-on-encroachment-on-waqf-property-in-angad-shah-takiya

Waqf property News : सजग नागरिक टाइम्स :पुणे :अंगडशहा तकिया येथील ऐतिहासिक जागेवर असलेले अतिक्रमण अखेर कारवाई करून हटविण्यात आले आहे,

अंगडशहा ताकिया च्या वक्फ मालमत्तेवर एका राजकीय कार्यकर्त्यांने भले मोठे पत्र्याचे शेड मारून जागा ताब्यात घेतली होती,

ती जागा ताब्यातून पुन्हा घेण्यासाठी सदरील अंगडशहा ताकिया ट्रस्टचे शरीफ्उद्दीन उर्फ रोशन दिल शाह सरगुरु यांनी वक्फ बोर्ड येथील कार्यालयात दाद मागितली होती.

action-on-encroachment-on-waqf-property-in-angad-shah-takiya

त्याची दखल घेत वक्फ बोर्डाने तातडीने अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश पारित केले होते.

Advertisement

त्या अनुषंगाने राजकीय कार्यकर्त्यांनी अपील करून कारवाई न करण्यासाठी धावपळ केली होती ,

काही वर्षापर्यंत केस चालले त्यानंतर सुनावणी होऊन शेवटी अपील अधिकाऱ्याने अपील फेटाळून वक्‍फ मालमत्तेला न्याय मिळवून देत अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

त्याची दखल घेत पुणे शहर हवेलीतील तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी यांच्या निगराणीखाली कारवाई करण्यात आली आहे.

या बद्दल ट्रस्टचे सरफूद्दिन उर्फ रोशन दिलशाह यांनी सजग नागरिक टाइम्स ला हि माहिती दिली.

इतर बातमी : जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी निर्भिड बनावे_ फिरोज मुल्ला

Share Now