ताज्या घडामोडी

राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील गुणवंतांचा ११ ऑगस्ट रोजी पुण्यात सत्कार

Advertisement

अल्पसंख्यांक (minority) समाजातील गुणवंतांचा  पुण्यात  होणार सत्कार

award-meritorious-quality-of-the-minority-community-in-pune-on-august

सजग नागरिक टाइम्स: पुणे :राज्यभरातील मुस्लीम,ख्रीश्चन,बौद्ध,जैन,पारशी,सीख या अल्पसंख्यांक (minority)समाजातील दहावी परीक्षेत यशस्वी गुणवंतांचा सत्कार

‘अवामी महाज’या सामाजिक संस्थेतर्फे तसेच’हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट’या ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

(minority) अल्पसंख्यांकांचा  हा कार्यक्रम रत्नाकर यशवंत गायकवाड (माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य)

यांच्या हस्ते शनिवार, 11 ऑगस्ट रोजी डॉ. ए.आर.शेख असेम्ब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे सकाळी 10.30 वाजता होणार आहे. 

Advertisement

या कार्यक्रमादरम्यान 50 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. यात मुस्लिम, जैन,ख्रिस्चन,बुद्ध,पारसी,

शिख या समाजातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.राज्यातील ९ शालांत परीक्षा मंडळातून ९७ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे(minority)विद्यार्थी निवडण्यात आले आहेत.

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

 ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत,

अशी माहिती झुबेर शेख (सचिव,हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट) यांनी पत्रकाद्वारे दिली.

वाहिद बियाबानी (सचिव, अवामी महाज), सीराज सुतार (निमंत्रक), सय्यद आरिफ अल्ताफ (सह निमंत्रक) यांनी कार्यक्रमाचे संयोंजन केले आहे.

हे पण वाचा मुस्लिम समाज मूक मोर्चाच्या तयारीत

Share Now

One thought on “राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील गुणवंतांचा ११ ऑगस्ट रोजी पुण्यात सत्कार

Leave a Reply