ताज्या घडामोडीपुणे

फॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार

Advertisement

(Fashion Street burn victims) डॉ.पी. ए. इनामदार यांची बैठकीत माहिती

(Fashion Street burn victims) सजग नागरिक टाइम्स :

पुणे :कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार भरीव मदत करणार असून त्यासाठी  निधी संकलित केला जात असल्याची माहिती डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट,

अवामी महाज, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट या संस्थांची बैठक बुधवारी आझम कॅम्पस येथे झाली. डॉ.पी. ए. इनामदार हे अध्यक्षस्थानी होते.

azam-campus-family-will-help-fashion-street-burn-victims

फॅशन स्ट्रीट जळीत ग्रस्तांची माहिती संकलित करून त्यांना भरीव मदत करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Advertisement

त्यासाठी या संस्थांमध्ये निधी संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

video पहा 

फॅशन स्ट्रीटवरील आग ही दुर्देवी घटना असून या व्यावसायिकांना जीवनात पुन्हा उभे करण्यासाठी आझम कॅम्पस शैक्षणिक,

सामाजिक परिवार भरीव मदत करेल. पुणे शहरातील, देशातील प्रत्येक संकटात मदत करण्याची परंपरा आझम कॅम्पस सुरू ठेवेल,

अशी भावना यावेळी डॉ.पी. ए. इनामदार यांनी व्यक्त केली.

वाचा: पुण्यातील छ.शिवाजी मार्केट व फॅशन स्ट्रीट मधील आगीची उच्चस्तरीय समिती गठीत करून तत्परतेने चौकशी करण्याची मागणी

Share Now