सय्यद नगर मोहम्मद वाडी रोड रेल्वे गेट पासून ते गल्ली नंबर 20 पर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हलक्या दर्जाचे माल वापरून डांबरीकरण केल्यामुळे रस्ता अक्षरशः खड्ड्याने भरला आहे.
रस्त्यावरून ये जा करताना वाहण चालकांना, महिलांना, रुग्णांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
सदरील रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांची व अधिकारी वर्गाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच ठेकेदाराचे बिल ,डिपॉझिट जप्त करण्यात यावे व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी होत आहे.