Baramati News:आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल अश्या आशयाचे बारामतीमध्ये झळकले पोस्टर्स.
Baramati News :सजग नागरिक टाइम्स: बारामती (दि. २९) – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुंकीचे निकाल लागले आहेत.
बारामतीमधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी त्यांच्या विरोधात उभे राहिलेले
भाजपाचे गोपीनाथ पडळकर यांचा तब्बस १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
या विजयानंतर बारामतीत पोस्टरबाजीला उधाण आले आहे.
‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये झळकू लागले आहे.
हेपण वाचा: दिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर भैरवनाथ”मंदिर येथे दिप प्रज्वलित करून मिठाई वाटप
मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकरांसह सर्वच उमेदवारांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.
तसेच अजित पवारांसमोरील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते.
अजित पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले.
त्याबॅनर्सवरील मजकूर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.
त्यामुळे बारामतीसह सर्वत्र या पोस्टर्सचीच चर्चा आहे.
सर्व भारतियांना सजग नागरिक टाइम्स तर्फे दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Diwali news : kondhwa येथे दिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर Incredible Group तर्फे भैरवनाथ” मंदिर येथे दिप प्रज्वलित करून मिठाई वाटप
Diwali news: सजग नागरिक टाइम्स : kondhwa :दिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर Incredible Group “संस्थापक अस्लम इसाक बागवान यांच्या तर्फे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक
म्हणून कोंढवा येथील ग्राम दैवत “भैरवनाथ ” मंदिर येथे दिप प्रज्वलित करून मिठाई वाटप करण्यात आले,
यावेळी कोंढवा गावातील ग्रामस्थ, ट्रस्टि, माऊली भोईटे, पवार साहेब,लोणकर, बनसोडे मंदिराचे पुजारी तसेच बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे निवेदन आशोक सोनावणे सर यांनी केले, अध्यक्षिय विचार जुन्नर महापालिकेचे सभापती जमिरभाई कागजी यांनी व्यक्त केले,
प्रस्तावना डॉ, आदिल आतार यानी व आभार छबिल पटेल यांनी मानले.
या कार्यक्रमाला जमीयतूल हिंद चे जावेदभाई, एम आय एम चे मजहर खान, ह्यूमिनीटि फौंडेशनचे कुमेल रजा, राबता चे जाहिदसर,
हेपण वाचा : ६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना
अल खादिम फौंडेशनचे , सलिम पटेकर, प्रहार संघटनेचे शानु पठाण, साहिल मणियार, तसेच अल्पसंख्याकचे आनंदकुमार दुबे,
आबिदा इनादार संस्थेचे ट्रस्टि इकबाल मुलानी Incredible group रुग्ण विभागाचे इकबाल शेख , यासिन भाई, आरिफखान,
समिर मुल्ला, इरफान सिद्दिकी तसेच महिला आघाडीचे, विजया क्षीरसागर, रजिया बेल्लारी, सुरय्या शेख,
सुरेखा जुजकर, जबीन मँडम, या सर्वांनी या एकता आभियानात सहकार्य केले.
संपूर्ण भारतदेशात अशीस एकता नांदावी अशी इच्छा सर्वानी व्यकत केली. आणी हिंदु बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.