Bhakti Rang‘ मैफिलीला रसिकांनी चांगली दाद दिली.
सजग नागरीक टाईम्स:पुणे :’Bhakti Rang‘ मैफिलीने ‘भारतीय विद्या भवन‘ चे वातावरण भक्तिमय झाले. किराणा घराण्यातील स्वर गायिका सुजाता गुरव प्रस्तुत ‘भक्ती रंग’ मैफिलीला रसिकांनी चांगली दाद दिली.
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ५६ वा कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडला. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
तुमच्या प्रिय मित्रांना सुंदर शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा
‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे आयोजित केला होता.
‘Bhakti Rang‘ या मैफिलीला सुजाता गुरव यांनी किराणा घराण्याच्या मुलतानी रागाने सुरुवात केली. मुलतानी रागातील ‘ए गोकूलगाव’ ही एकतालावर आधारित आणि द्रुत तालातील ‘नैन में आन बान’ चीज सादर केली. ‘अबीर गुलाल’, सरस्वती भजन, मीरा भजन गायले. ‘युवती मना’ आणि ‘शूरा मी वंदिले’ या नाट्यगीतांचा देखील समावेश होता.
पंडित नंदीकेश्वर गुरव (तबला), मुकुंद जोशी (ताल), उपेंद्र सहस्त्रबुद्धे (हार्मोनियम), शिवाजी कदम (पखवाज) यांनी साथसंगत केली.
सुजाता गुरव प्रसिद्ध शास्त्रीय गायक , मूळच्या धारवाड च्या , पंडित संगमेश्वर गुरव यांच्या कन्या आणि पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या त्या बहीण असलेल्या सुजाता गुरव यांनी रसिकांची मने जिंकली.जलद तान आणि मुरकी या गाण्याच्या विशेष शैली साठी त्या प्रसिद्ध आहेत, त्या गायकीचा प्रत्यय त्यांनी या मैफलीत दिला.