ताज्या घडामोडीपुणे

अतिक्रमण वाहन चालक बनला अधिकारी?

Advertisement

भवनीपेठ अतिक्रमण विभागातील वाहन चालक गोविंद गंधाल याचे प्रताप.

सजग नागरिक टाइम्स : पुणे: मध्यंतरी अनेक ठिकाणी अतिक्रमण अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या बातम्या ही आल्या होत्या तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याबद्दल आंदोलनही केले होते.

अतिक्रमण कारवाई करत असताना वाहनचालकाने जागरूक राहून गाडीमध्ये बसणे हे कंपल्सरी असूनही वाहन चालक गोविंद गंधाल गाडी सोडून कारवाईचे ठिकाणी जाऊन इतर कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Advertisement

कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांवर एखाद्या वेळेस जीव घेणा हल्ला झाला तर त्यांना पळून जाण्यासाठी गाडीचा वापर होऊ शकतो, जर वाहनचालकच गाडीमध्ये नसेल तर कर्मचारी आपला जीव वाचवणार कसा. तसेच गोविंद गंधाल हा ऑन डीवटीवर असताना सतत फोनवर बोलत असल्याचे ही निदर्शनास आले आहे.डीवटीवर असताना हे अनधिकृत व्यवसायिकांना कारवाईची माहिती तर पुरवत नसेल ना अशे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

भवानी पेठ अतिक्रमण विभागातील वाहन चालक गोविंद गंधाल यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांचा जीव जाण्याची वेळ आली आहे तसेच याला गाडी सोडून इतर ठिकाणी फिरण्याचे अधिकार कोणी दिले?, व डीवटीवर असताना फोन वापरण्याची परवानगी कोणी दिली? गोविंद गंधाल या वाहन चालकावर कारवाई होणार का?

असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले असून याच्यावर कडक कारवईची मागणी होत आहे.

Share Now