ताज्या घडामोडीपुणे

भिमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटच्या मृत्यूस आत्महत्या ठरविल्याने आंदोलन

Advertisement

Bhima koregaon violence victim पूजा सकटच्या मृत्यूस आत्महत्या ठरविल्याने आंदोलन

bhima koregaon violence victim pooja sakat issue

सजग नागरिक टाइम्स :Bhima koregaon violence victim: भिमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटच्या मृत्यूस आत्महत्या ठरवून पोलीस प्रशासनाने अन्याय केल्याच्या निषेधार्थ

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख मागण्यांसाठी 13 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

23 एप्रिल रोजी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार असलेली(pooja sakat) पूजा सुरेश सकट

या 17 वर्षाच्या मुलीचा मृतदेह राहत्या घराजवळ विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे दलित आणि हिंदूत्ववादी गटामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला होता.(bhima koregaon dangal)

या प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल हि झाले .

हेपण वाचा : भीमा कोरेगाव दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

याप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक आणि जामीन मिळाला आहे. या दंगलीची पूजा सकट ही साक्षीदार होती.

तिचा मृतदेह घराबाहेरील विहिरीत आढळून आला होता . पूजा हिचा घातपात झाला असल्याची शक्यता पूजाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती .

पूजाच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चौकशीची मागणी ही केली होती .

Advertisement

भीमा कोरेगाव प्रकरणी साक्षीदार असलेल्या पूजाला आणि तिच्या  कुटुंबियांना धमक्या येत असल्याची तक्रार ही त्यांनी केली होती .

पूजा सकट हिच्या मृत्यूचा तपास सी.बी. आय. मार्फत करून आरोपीना तत्काळ अटक करण्यात यावी . पूजा सकट हिच्या कुटुंबियांना तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे .

भिमा कोरेगाव दंगलीमधील पूर्व नियोजित कटात सहभागी असणारे समाजकंटक व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

या धरणे आंदोलनात रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते रामभाऊ डंबाळे , सविता सिंग , भागवत कांबळे , विशाल रेड्डी , सिध्दार्थ सुर्वे , भरत मिरेकर ,

मुमताज शेख , दत्ता ढवळे , प्रदीप कांबळे , उध्दव कांबळे , विकास ढावरे , निलेश लोंढे , परशुराम  चव्हाण ,

सचिन कांबळे व लता शिंगारे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते अशी माहिती मिळाली.

रिलेटेड बातमी :Bhima Koregaon दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

सजग नागरिक टाइम्स : June 8, 2018 : दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद (Bhima Koregaon violence issue)

भिमा कोरेगांव येथे विजय स्तभास मानवंदना देण्यासाठी व शौर्य दिवस साजरा करण्याच्या

कार्यक्रमा दरम्यान उफाळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे याचा खून करण्यात आला होता.

खून करणार्‍यांचा व्हिडीओ आणि फोटो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (c i  d ) मिळाला असून

आरेापींबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन सीआयडी मार्फत करण्यात आले आहे.

Share Now