ताज्या घडामोडीपुणे

भाजप आमदार महेश लांडगेंचे बेफाम नृत्य

Advertisement

(MLA Mahesh landge Dance) आमदार महेश लांडगेंचे नाचतानाचे व्हिडीओ वायरल

(MLA Mahesh landge Dance) पिंपरी चिंचवड : भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व

पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा बेफाम होऊन नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

त्यांची कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी महेश लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले.

BJP MLA Mahesh landge Dance

मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे सर्वत्र टीका होत आहे.

भाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे.

या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकतेच पार पडले.

त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार महेश लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले.

समर्थकांच्या खांद्यावर बसून महेश लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला.

Advertisement

वाचा : पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाने रेशनिंग दुकानदारांकडून कोट्यावधी रुपयांची केली वसुली

कोरोना नियमांच्या पायमल्लीवरुन टीका

दरम्यान, या कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्याने सर्वत्र टीका होत आहे.

या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओत दिसत आहेत.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचा : आज ही अपनी न्यूज वेबसाइट बनावाए और पैसा कमाएं.

Share Now