- स्वित्झर्लंडमधील जनमत चाचणीत ५१ टक्के नागरिकांचा बुरखा बंदिस पाठींबा
- इस्लामिक फोबियातून हा निर्णय झाल्याचा आरोप, स्वित्झर्लंडमधील मुस्लीम संघटना नाराज
ज्यूरिख: फ्रान्सनंतर आता स्वित्झर्लंडमध्ये बुरखा बंदी होण्याची दाट शक्यता आहे.
स्वित्झर्लंडमध्ये एक जनमत चाचणी झाली त्या चाचणीत ५१ टक्के नागरीकांनी बुरखा बंदिस पाठींबा दिला.
बुरखा बंदीच्या बाजूने व त्याच्या विरोधातील मतांमध्ये फारसा फरक नाही . १४ लाख २६,९९२ लोकांनी बुरखा बंदीला पाठिंबा दिला आहे.
तर १३ लाख ५९ हजार ६२१ लोकांनी बुरखा बंदीला विरोध दाखविला आहे. बुरखा बंदीच्या मुद्यावरून मुस्लीम संघटनांनी नाराजी दर्शविली आहे.
ही बुरखा बंदी लागू झाल्यानंतर हिजाब किंवा बुरखा घालण्यास बंदी घातली जाणार आहे.
प्रस्तावात इस्लाम आणि बुरख्याचा थेट उल्लेख नाही.
परंतु मुस्लिम संघटनांनी व सर्व राजकारणीनी बुरखा बंदीस इस्लामीफोबियातूनउचलण्यात आलेले एक पाउल असल्याचे एक पाउल म्हंटले आहे.
२००९ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये नव्या मिनाराच्या बांधकामास बंदी घालण्यासाठीही जनमताचा कौल घेण्यात आला होता.
बंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर क्रीडा स्टेडियम, रेस्टॉरंट्स, सार्वजनिक वाहतूक किंवा रस्त्यांवर चालताना चेहरा झाकता येणार नाही.
मात्र, कार्निवल उत्सव, धार्मिक स्थळे, आणि आरोग्याविषयी काही समस्या असेल तर त्यांना या बंदीतून सवलत देण्यात आली आहे.