छत्तीसगडमधील गरिआबंदमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या 36 तासांपासून जवानांचा जंगलात नक्षलवाद्यांशी सामना सुरू आहे. आतापर्यंत एकूण 12 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. कुऱ्हाडीघाटच्या भालुदिग्गीच्या डोंगरावर काल सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
या चकमकीत सुरक्षा दलाच्या 10 तुकड्या सहभागी झाल्या आहेत
चकमकीनंतर घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान काल दोन नक्षलवाद्यांचे (एक महिला, एक पुरुष) मृतदेह सापडले. यावेळी एका जखमी जवानाला एअरलिफ्ट करून रायपूरला आणण्यात आले. छत्तीसगड आणि ओरिसा सुरक्षा दलाच्या एकूण 10 टीम नक्षलवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन करत आहेत. झडतीदरम्यान आणखी नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या मृतदेहांची सध्या ओळख पटली आहे.
नक्षलवाद्यांची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांची कारवाई
ओडिशा आणि छत्तीसगड सीमेवरील कुल्हारी घाटाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर ओडिशा आणि छत्तीसगड पोलिसांनी मिळून नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई सुरू केली. कुऱ्हाडी घाट राखीव जंगलातील घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.