HomeNews Updatesसुप्रसिद्ध कोरियाग्राफर सरोज खान यांचे दुखद निधन

सुप्रसिद्ध कोरियाग्राफर सरोज खान यांचे दुखद निधन

Saroj Khan passed away : सरोज खान यांनी १९८६ सालापासून २०१९ पर्यंत अनेक सिनेमांमध्ये कोरियाग्राफी केली आहे.

choreographer Saroj Khan passed away 2020

Saroj Khan passed away : मुंबई – बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दुखद निधन झाले आहे.

मुंबईतील एका रुग्णालयात गेल्या २० जूनपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते,

त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रेशनिंग किट मधील तेल चोरी संदर्भात पोलीसात तक्रार दाखल

सरोज खान यांनी १९८६ सालापासून २०१९ पर्यंत अनेक सिनेमांमध्ये कोरियाग्राफी केली होती.

ज्यात एक-दोन तीन, काटे नही कटते, हवा-हवाई, ना जाने कहा से आई है, निंबुडा-निंबुडा,दिल धक धक करने लगा,

हमको आजकल है इंतजार,डोला रे डोला, चोली के पीछे यासारख्या अनेक सुपरहिट आणि ऐतिहासिक गाण्यांचा समावेश आहे.

सरोज खान यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती.

पण ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तेव्हापासून त्या रुग्णालयातच दाखल होत्या. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्यानंतर आज सरोज खान यांचं रुग्णालयात निधन झालं आहे.

घरफोडी व चोरी च्या प्रकरणात शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular