ताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

मोक्यातील सहा महीन्यापासुन फरार असलेला चुहा गँगचा मुख्य सुत्रधार पिंजऱ्यात कैद,

Advertisement

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

सजग नागरिक टाइम्स: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम या गुन्हयातील टोळी प्रमुख आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, (वय 23 वर्षे, रा लुनिया बिल्डींग, चौथा मजला, कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे ) हा दिनांक 16 फेब्रुारीपासुन फरार होता.

फरार कालावधीत तो त्याचे ओळख लपवुन वारंवार वेगवेगळया जिल्हयांमध्ये त्यांची ओळख व ठाव ठिकाण बदलुन वास्तव करीत होता.

त्यादरम्यान कात्रज आणि संतोषनगर परीसरात स्वताचे व टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.

सदर आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे यांना आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, हा मु.पो. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे येथे राहत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी निरा, ता. पुरंदर, जि. पुणे येथे जावून आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई साठी गुन्हयाचे तपासी अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी सदर आरोपीस अटक केली आहे.

Advertisement

हेपण वाचा : स्टॉक ट्रेडिंग म्हणजे काय? ,ट्रेडर कोणाला म्हणतात?ट्रेडिंगला कशी सुरुवात करावी?

आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर यापुर्वी मोका कायदयांन्वये कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्हयातुन त्यास जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापीत करण्याकरता त्यांचे साथीदारांनी पुन्हा त्यांची टोळी तयार करुन त्याने सदरचा गुन्हा केला आहे. विशेषता आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा त्याचे टोळीचे वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी कात्रज भागातील शिक्षण घेणारे बालकांचा वापर करुन त्यांचे टोळीची कात्रज भागात दहशत निर्माण करीत होता.

सदरची कारवाई प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, नारायण शिरगावकर , सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.

Share Now