ताज्या घडामोडी

कोंढव्यातील श्री संत गाडगे महाराज शाळेतील एका शिक्षकाला कोरोना चा संसर्ग,

Advertisement

(Corona infection to a teache) 400 पेक्षा जास्त विद्यार्थी ‘होम क्वारंटाईन’

(Corona infection to a teache) sajag nagrik times:

पुणे  :  पुण्याच्या कोंढव्यातील श्री संत गाडगे महाराज शाळेतील एका शिक्षकाला कोरोना चा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले असल्याची माहिती मिळाली .

या घटनेनंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यात 4 जानेवारीपासून 9 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यानंतर 5 वी ते 8 वी चे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेत.

आता शाळेतील शिक्षकालाच कोरोनाची बाधा झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ज्या शिक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे ते माध्यमिक शाळेत शिकवतात.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशातील सर्वच शाळा गेल्या 10 महिन्यांपासून बंद होत्या. पण आता त्या टप्प्या टप्प्याने सुरु होत आहेत.

Advertisement

             12 शिक्षकांचा रिपोर्ट अद्याप प्रतिक्षेत

या शाळेतील शिक्षकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 12 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली.

सध्या या सर्व शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहे.

          शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची घेतली जातेय माहिती.

गेल्या आठवड्यात शाळेत हजर राहिलेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती घेतली जात असून, त्यांच्या प्रकृतीची माहितीही घेतली जात आहे.

शाळा 5 दिवसांपासून बंद होती. त्यामुळे इतर कोणत्याही शिक्षकांना कोरोनाची लक्षणे नाहीत.

तसेच जर कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील तर त्यांनी जवळच्या कोरोना सेंटरमध्ये जाऊन चाचणी करावी,

असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले आहे.

Share Now

One thought on “कोंढव्यातील श्री संत गाडगे महाराज शाळेतील एका शिक्षकाला कोरोना चा संसर्ग,

Comments are closed.