court order:मृत व्यक्तीची बोगसपणे सही करून जमीन विकल्या प्रकरणी दौंड कोर्टाकडून गुन्हा दाखल करून तपास करण्याचे यवत पोलिसांना आदेश.
कमल भगवान डोंबे यांची खानदानी मिळकतीची बोगसपणे परस्पर विक्री करण्यात आल्या प्रकरणी कमल भगवान डोंबे यांनी अॅड. साजिद शाह यांच्या मार्फत दौंड न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती त्यावर न्यायालयाने यवत पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहे .
कमल भगवान डोंबे यांनी आर्थिक परिस्थितीमुळे जमीन विकण्याचे ठरविले व 7/12 मिळण्यासाठी अर्ज करून 7/12 मिळवल्यावर त्यांना सातबारावर त्यांचे नावाऐवजी भलत्याचेच नावे आढळल्याने सदरील बिंग फुटले.
हिंदी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सदरील हकीकत अशिकी कमल भगवान डोंबे यांचे वडील भगवान वामन डोंबे यांचा मृत्यू 28/5/1970 रोजी झाला असून काही एजंटांनी अधिकाऱ्याला सोबत घेऊन मयत भगवान डोंबे यांची वडिलोपार्जित जमीन 2001 साली बोगस व्यक्तिला उभा करून विकण्यात आली .
यावर न्याय मिळावा म्हणून फिर्यादिंनी अॅड.साजिद शाह, अॅड.उमेश गवळी अॅड.श्रीकांत बनसोडे यांच्या मार्फत पोलिसांना लेखी तक्रार देऊन त्यांनी काहीही दाद न दिल्याने दौंड कोर्टात 419, 420, 406, 467,465,468,469,471,120ब सह 34 प्रमाणे फिर्याद दाखल केली. यवत पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे court ने order दिले आहे .