ब्रेकिंग न्यूज

ई पॉझ मशिनी बसवून हि रेशनिंग धान्याचा काळाबाजार चालू, एकावर गुन्हा दाखल

Advertisement

सजग नागरीक टाईम्स ;प्रतिनिधी, अजहर खान 
पुणे शहरात मार्च 2017 मध्ये मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून ई पॉझ मशिनी आणल्या गेल्या त्याची अंमलबजावणी हि सुरू झाली ई पॉझ मशिनी आनन्या मागचा उद्देश होता कि रेशनिंग धान्याचा होणारा काळाबाजार थांबवणे .त्यात स्वता अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे लक्ष देऊन होते .परंतु बापट ईतर कामात व्यस्त होताच पुणे शहरात परत रेशनिंगचा काळाबाजार सुरू झाल्याचे चित्र दिसुन येते आहे असाच एक प्रकार अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे पुण्याचे दौऱ्यावर असताना घडला.
 

दि 16 नोव्हेंबर 2017 रोजी रेशनिंगचा धान्य घेऊन जाणारा ट्रक नं MH06 8559 मुंढवा पोलीसांनी बी टी कवडे रोडवर धरला .ट्रक चालकाकडे विचारणा केल्यावर तो गडबडून उलटसुलट उत्तरे देऊ लागला पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी तो ट्रक सहित ड्रायव्हरला घेऊन पोलीस ठाणे गाठले व चौकशी साठी पोलीसांनी अन्न धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी यांना पत्र बजावून सदरील धान्याची माहिती मागितली .हे पत्र पोहचताच अन्न धान्य वितरण कार्यालयातील यंत्रणा खडबडून जागे होऊन कामाला लागली शेवटी तपासणीच्या दरम्यान ज्या ठिकाण वरून धान्य भरण्यात आले होते त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता रस्त्यावर गहू आणि तांदूळ पडलेले असल्याचे दिसून आले .आजू बाजूला विचारणा केली असता सदरील गोडाऊन हे सोनवणे नामक दुकानदाराचे असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. सदरील पकडलेला गहू आणि तांदूळ हे उघडून पाहिले असताना हे रेशनिंगचेच असल्याचे पटल्यावर अन्न धान्य पुरवठा निरीक्षक सुदेशा उत्तम कांबळे वय 52 वर्षे  यांनी फिर्याद दिल्यावर ट्रक ड्रायव्हर नामे  नितीन अजिनाथ सोनवणे वय 33 वर्षे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदरील 390 गोण्या मधील माल एकुण 4 लाख 87 हजार रूपये ईतकी किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर धान्य निघालेच कसे काय? सदरील दुकानदार नागरिकांना माल वाटप करत होता का? परिसरातील  ईतर दुकांनाचा पण त्यात माल आहे का? अजुन किती दुकानदार यात शामिल आहे? अधिकारी व कर्मचारी यांचे दुकानदारा सोबत साटेलोटे तर नाही ना? पुरवठा निरीक्षक वेळोवेळी दुकाने तापसणी करत होते का? ह्या सर्व प्रकाराची खरंच चौकशी होणार का? गरिबांच्या तोंडाचा घास पळविणाऱ्यावर एमपीडीए नुसार गुन्हा दाखल होणार का?  असे अनेक प्रश्न नागरीकांकडुन विचारले जात आहे.

Share Now

Leave a Reply