Earth was created on Friday : पवित्र रमजान महिन्याची आगेकूच आता मध्यंतराकडे होत आहे .
Earth was created on Friday : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्याची आगेकूच आता मध्यंतराकडे होत आहे .
उद्या पंधरा तारखेला रमजान महिन्याचे मध्यंतर होणार आहे.आतापर्यंतचे चौदा दिवस कसे निघून गेले ते कळले सुद्धा नाही .
कोरोनाच्या चिंतेने सर्वांचे लक्ष या महामारी कडे लागले आहे .या रोगाच्या निर्मूलनासाठी घराघरातून दररोज दुआ केली जात आहे .
लवकरात लवकर मानवजातीला या रोगापासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना प्रत्येक जण करीत आहे.
कुरआन ए पाकचा संदेश
सर्व मानवजातीसाठी सध्याचा काळ हा परीक्षा काळ असून परमदयालू परमेश्वर
आपल्या सर्वांवर लवकरच दया करील आणि या महाभयंकर संकटापासून सर्वांची सुटका होईल अशी उम्मीद आहे .
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आठवड्याचे सात ही वार खूप महत्त्वपूर्ण आहेत . प्रत्येक धर्माने एखाद्या विशिष्ट वाराला महत्त्व दिले आहे .
इस्लाम धर्मामध्ये सुद्धा शुक्रवार म्हणजे जुमा (फ्रायडे ) महत्वपूर्ण समजला जातो . शुक्रवार ला ईद उल मोमिनीन म्हणजे मोमिनो की ईद का दिन म्हणून संबोधले जाते .
इस्लामी इतिहासानुसार जगाच्या संपूर्ण इतिहासामध्ये शुक्रवार या दिवसाला फार महत्त्व आहे . या सृष्टीची निर्मिती शुक्रवारच्या दिवशी झाली .
पृथ्वीची निर्मिती शुक्रवारी झाली .धार्मिक दृष्ट्या सर्व ऐतिहासिक घटना शुक्रवारी घडल्या असून या जगाचा शेवट सुद्धा शुक्रवारी होणार आहे .
कुरआन मधील जीवन
म्हणून शुक्रवार हा दिन महत्त्वपूर्ण गणला जातो . या दिवशी साप्ताहिक नमाज (नमाज ए जुमा) म्हणून अदा केली जाते .
या दिवशी दुपारी सर्व जण मशिदीमध्ये एकत्र येतात आणि सामूहिक नमाज आदा करतात . रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार सुद्धा जुमातुल विदाअ म्हणून ओळखला जातो .
हिंदू धर्मात श्रावण महिन्यात ज्याप्रमाणे सोमवारला महत्व दिले जाते .ख्रिश्चन धर्मात रविवार (संडे) ला महत्त्व दिले जाते . असे प्रत्येकाचे वेगवेगळे वार निश्चित झालेले आहेत .
अल्लाहने ही सृष्टी निर्माण केली त्याचबरोबर सृष्टीचा कारभार पुढे चालवण्यासाठी या सर्व चालीरीती, प्रथा, परंपरा, रुढ झाल्या .
धर्म वेगळे, पंथ वेगळे, वार वेगळे, पद्धती वेगळ्या असल्या तरी सर्वांचा हेतू हा मानवी कल्याण एवढाच आहे.
मानवाच्या कल्याणासाठी सगळ्याच धर्मांनी विविध उपाय सुचविले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना माणसाने मात्र गफलत केली.
आणि त्यातून या संपूर्ण जगभरामध्ये धर्म आणि जातीच्या भिंती उभ्या राहिल्या. त्यातून मतभेद निर्माण झाले. वाद विवाद निर्माण झाले.
आणि मग सदाचाराची जागा तिरस्काराने घेतली.प्रेषित हजरत पैगंबर साहेबांनी इस्लामची शिकवण देताना इतर कोणत्याही धर्माचा द्वेष करू नका असे सांगितले आहे.
म्हणूनच आपण पाहतो की इस्लाम ,मुसलमान आणि त्यांच्या प्रथा याबद्दल सातत्याने कितीही लोक विरोधात बोलत असले तरी मुस्लिम समाजातील कोणीही इतर धर्मियांच्या धार्मिक चालीरीती,
प्रार्थना यांना नावे ठेवीत नाही . कारण इस्लामची ती शिकवण नाही .
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वार्थीपणा शिरल्यामुळे आपले हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राजकारण केले जाते .
त्याचा फटका धार्मिक कार्याला सुद्धा बसतो . रमजान महिन्यातील सहेरी आणि इफ्तारची वेळ लोकांना समजावी यासाठी मशिदीतून अजाण दिली जाते .
सध्या सर्व मंदिर, मशिद ,चर्च बंद आहेत. मर्यादित स्वरूपात त्याठिकाणी पूजाअर्चा आणि प्रार्थना करण्याची मुभा आहे .
video : Lockdown मध्ये अडकलेल्या मजुरांना गावी जाण्याची मुभा की शिक्षा
अजाण देणे म्हणजे लोकांना गोळा करणे नव्हे . फक्त एक माणूस त्याठिकाणी अजाण पुकारतो आणि लोक घराघरातून रोजा इफ्तार करतात . नमाज पठण सुद्धा घरातच केले जात आहे .
हे सर्व शासनाच्या परवानगीने करीत असताना समाजातील काही बांधव केवळ राजकीय उद्देशाने अशा धार्मिक गोष्टींना सुद्धा विरोध करतात हे पाहून खेद वाटतो .
यावर्षी तर ईदची नमाज सुद्धा मशिदीत किंवा ईदगाह यामध्ये होणार नाही असे आज तरी दिसते . तो आग्रह मुस्लिम समाजाचा पण नाही .
जर ईदच्या नमाजला परवानगी मागितली तर आपण विरोध करणे समजू शकतो . परंतु तशी मागणीही कोणी करणार नाही .
परिस्थितीची जाणीव सर्वांना आहे . सर्वांनी एकोप्याने राहून आपल्या समोर आलेल्या संकटाचा मुकाबला केला पाहिजे .
मतभेद सातत्याने निर्माण होत राहतील . पण आजची वेळ ही सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे . सर्वजण एक होऊन या संकटाचा मुकाबला करू या . (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082