Homeताज्या घडामोडी"मॅजिकविन" बेटिंग प्रकरणात ईडीचे छापे, 3.55 कोटींची मालमत्ता जप्त

“मॅजिकविन” बेटिंग प्रकरणात ईडीचे छापे, 3.55 कोटींची मालमत्ता जप्त


नवी दिल्ली:

ऑनलाइन सट्टेबाजीसंदर्भात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील २१ ठिकाणी छापे टाकले. हा छापा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट म्हणजेच पीएमएलए अंतर्गत टाकण्यात आला आहे. 10 आणि 12 डिसेंबर रोजी हे छापे टाकण्यात आले होते. बेकायदेशीर क्रिकेट सामन्यांचे प्रसारण आणि ऑनलाइन सट्टेबाजीच्या सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

  • छाप्यादरम्यान बँकेची ३० लाखांची रक्कम गोठवण्यात आली असून, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
  • ऑनलाइन बेटिंग ॲप मॅजिकविन आणि इतरांविरुद्ध अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता.
  • तपासणीत असे दिसून आले की “मॅजिकविन” ही एक बेटिंग वेबसाइट आहे, जी गेमिंग वेबसाइट म्हणून दाखवली गेली आहे.
  • आश्चर्याची बाब म्हणजे हे गेमिंग ॲप पाकिस्तानी नागरिकांनी विकसित केले असून ते दुबईत बसून काही भारतीय नागरिक चालवत होते.

या वेबसाइटवर दाखवले जाणारे सट्टेबाजीचे गेम फिलीपिन्स आणि इतर देशांमध्ये खेळले जातात जेथे बेटिंग कायदेशीर आहे, असे तपासात उघड झाले आहे. या गेमचे API मॅजिकविनवर कॉपी करून पुन्हा प्रसारित केले जातात.

  • वेबसाईटवर बेटिंग करणे, पैसे जमा करणे, पैसे काढणे आणि बेटिंग चालवणे या सर्व गोष्टी या ॲपचे मालक पाकिस्तानात बसून करत होते.
  • वेबसाईटवर खेळाडू आणि पंटर्सनी जमा केलेले पैसे वेगवेगळ्या शेल कंपन्या आणि बनावट बँक खात्यांद्वारे पाठवले गेले होते, असेही ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

ॲपच्या मालकांनी प्रथम क्रिप्टो चलनात पैसे गुंतवले, नंतर इन्कॅश आणि नंतर हवाला चॅनल वापरून पैसे दुबईला हस्तांतरित केले. बेटिंग विजेत्यांचे पैसे शेल कंपन्यांच्या पेमेंट गेटवे/एग्रीगेटरद्वारे त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले गेले. याशिवाय देशांतर्गत मनी ट्रान्सफर (डीएमटी) द्वारेही खेळाडूंना पैसे पाठवले जात होते.

तपासात असेही आढळून आले की बेटिंग ॲप मॅजिकविनने भारतात लॉन्च पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी भाग घेतला आणि त्याचा प्रचार केला. या सेलिब्रिटींनी मॅजिकविनसाठी फोटो आणि व्हिडिओ शूट केले आणि सोशल मीडियावर त्याच्या जाहिराती पोस्ट केल्या. याशिवाय देशाच्या अनेक भागांमध्ये विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रात आऊटडोअर होर्डिंग्जच्या माध्यमातून जाहिरातीही करण्यात आल्या होत्या.

याप्रकरणी ईडीच्या अहमदाबाद शाखेने आतापर्यंत ६८ ठिकाणी छापे टाकले असून, या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.


Source link

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular