पुणेब्रेकिंग न्यूज

सण, festival दरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका

Advertisement

सण, festival दरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका(festival)NEWS SAJAG NAGRIKK TIMES.SANATA

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व  महापालिका प्रशासनाला दिले आदेश .

सजग नागरिक टाइम्स:मुंबई : सण,(festival) उत्सवांदरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका, असा महत्वपूर्ण निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला दिले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने मंडप उभारले जातात. 

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

Advertisement

(festival)NEWS SAJAG NAGRIKK TIMES.SANATAत्यामुळे रूग्णवाहिका किंवा अत्यावश्यक वेळी याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, असे मत न्यायालयाने नोंदवले.रस्त्यावर जर बेकायदा मंडप उभारला तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.गणेशोत्सवासह इतर सण (festival) आणि उत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप उभारले जातात.

गिरीष बापट यांना दहा हजार रुपयांचा दंड

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकार आणि मनपा प्रशासनाला तंबी दिली. अशा प्रकरणात किमान मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या मोठ्या महापालिकांमध्ये बेकायदा मंडप उभारण्यास देऊ नये, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाचा आदेश मोडल्यास संबंधितांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे समजले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले. यापूर्वीही न्यायालयाने याप्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली होती.

Share Now

Leave a Reply