पुण्यातील मार्केट यार्ड भागात असलेल्या गंगाधाम चौकात भंगार आणि मांडवाच्या (Godown) गोडाऊनला आग लागली.
या आगीत ही दोन्ही Godownजळून खाक झाली. या आगीचे कारण समजू शकलेले नाही.
अग्निशमन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात असणार्या आई माताजी मंदिरालगत असणार्या
भंगार आणि मांडवाच्या गोडाऊनला आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीवर सात अग्निशमन दलाच्या गाड्यांनी नियंत्रण मिळवले.
पण तोवर दोन्ही गोडाऊन जळून गेले होते. ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.