Food grains reach :दीड लाख लोकांपर्यंत पोहोचविले अन्नधान्य, कार्यकर्ते करत आहेत दिवस-रात्र कष्ट.
Food grains reach : सजग नागरिक टाईम्स : कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून
महाराष्ट्र शासनाने 17 मेपर्यंत लाॅक डाउन करून संपूर्णपणे शटर डाऊन केले आहे.
यामुळे हातावर पोट असलेल्यांना चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी काहि समाजिक संस्था, संघटना सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना मदत करत आहेत.
अशीच पुण्यातील निर्मिक फाउंडेशन व वंदे मातरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हेवाडी येथील २३ गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे.
आज पर्यंत वंदे मातरम् संघटनेने (१,५०,०००) दीड लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पोचवून मोठा टप्पा पार केलेला आहे.
आझम कॅम्पस मस्जीदचे ६० बेडच्या क्वारंटाइन कक्षात रुपांतर
त्यांचे जेवढे कौतुक करता येईल तेवढे कमीच आहे.सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे,
निर्मिक फाउंडेशन च्या वतीने श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान बुधवार पेठ ,पुणे यांच्या कडून
अन्नदानासाठी वंदे मातरम संघटनेला ४०० किलो तांदूळ,४० किलो तूर डाळ, २० किलो हरबरा डाळ, २७ किलो गूळ, ६० किलो तेल उपलब्ध करून देण्यात आले,
त्यापैकी काही धान्य कोल्हेवाडी येथील बाहेरगावच्या २३ गरजू कुटुंबाना देऊन बाकी धान्य रोजच्या दानासाठी वापरले जाणार आहे.
अशी सेवा पुरविण्याचे काम लाॅकडाऊन संपे पर्यंत केली जाणार असल्याचे निर्मिक फाऊंडेशनचे सचिव अभिजीत अनाप यांनी माहिती दिली.
[…] […]