ताज्या घडामोडीपुणे

गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी मुस्लिम तरुणांनी केली हौदसहित रथाची व्यवस्था

Advertisement

( Muslim youths ) सजग नागरिक टाइम्स :

गणपती बाप्पांची मूर्ती घरात पोहचविण्यापासून ती विसर्जन करण्यापर्यंतची जबाबदारी कोंढव्यातील मुस्लिम तरुणांनी उचलली असून ,

सजविलेल्या टेम्पोरथात विसर्जन हौदाची सोय ही करण्यात आली आहे .

त्यांच्या या कार्याचे कौतुक कोंढवा परिसरात केले जात आहे .

कोरोना महामारीमुळे प्रशासनाने निर्बंध लावले आहेत त्याचे तंतोतंत पालन करत कोंढवा परिसरात गणेशोत्सव साजरा होत आहे .

कोंढवा खुर्द कमेला स्लाटर हाऊस येथील हसनभाई शेख प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष मोहसीन शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी परिसरातील वृद्ध नागरिकांच्या घरी गणेशमूर्ती पोहचविण्याचे काम केले .

या व्यतिरिक्त दहा दिवसामध्ये गणेश विसर्जनासाठी सजविलेल्या टेम्पोरथात पाण्याचा हौद ही ठेवण्यात आला आहे .

Advertisement

मुस्लिम तरुणांनी घरोघरी जाऊन विसर्जनाची तयारी केली आहे .या रथाचे उद्घाटन राजू केकाण यांनी केले .

यावेळी रॉनी अॅन्थोनी , जितू सारसर ,अजय शेंडगे , अमित सपकाळ , सुरेश सरोदे ,

उषा बोराडे ,संगीता सरोदे आदींसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते .

मुस्लिम तरुणांनी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी केलेली जय्यत तयारी पाहून कोंढवा परिसरातील सम्राट अशोक मित्र मंडळ ,

महात्मा फुले मित्र मंडळ , आझाद मित्र मंडळ या मंडळातील सर्व सभासदांनी या तरुणांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे .

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व भक्तांना बाप्पांचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडता यावे यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे मोहसीन शेख यांनी सांगितले .

वाचा : WhatsApp युजर्सला मोठा झटका ! लवकरच ‘या’ ४३ स्मार्टफोन वर Whatsapp चालणार नाही,

Share Now

One thought on “गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी मुस्लिम तरुणांनी केली हौदसहित रथाची व्यवस्था

Comments are closed.