सजग नागरिक टाइम्स : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे ( पीएमआरडीए ) आलेल्या ‘ अॅमेनिटी स्पेस भाडेपट्ट्याने ‘ देण्याचा प्रस्ताव अयोग्य असून , याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत . या प्रक्रियेला तातडीने स्थगिती द्यावी ; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर , प्रशांत बधे ,सुहास कुलकर्णी यांनी दिला आहे . सध्या ‘ पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा जाहीर झाला आहे .
त्यावर प्राप्त हरकती , सूचनांवर सुनावणी घेण्याचे काम चालू असून हा विरोध झाला आहे . याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी , राज्याचे मुख्य सचिव आणि पीएमआरडीएचे महानगर आयुक्त यांना पत्र पाठविण्यात आलेत . मोकळे भूखंड भाडेपट्ट्याने देण्याबाबत पीएमआरडीएकडून जाहिरात देण्यात आली आहे . पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा जाहीर झाला आहे . त्यावर प्राप्त हरकती , सूचनांवर सुनावणी घेण्याचे काम सुरू असताना ‘ पीएमआरडीए’ने एकूण १७ सुविधा क्षेत्र भाडेपट्ट्याने देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली असल्याचे उज्ज्वल केसकर म्हणाले.