Mundon against CAA NRC : केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन
Mundon against CAA NRC : सजग नागरिक टाइम्स : पुणे :- समस्त लोहियानगर , घोरपडे पेठ पुणे , लोहियानगर रहिवासी संघ
व नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ सामुहिक मुंडण आंदोलन केले,
सदरिल आंदोलन हे दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता एकबोटे कॉलोनी घोरपडे पेठ येथे करण्यात आले .
यावेळी माजी.नगरसेवक शांतीलाल मिसाळ , जुबेर दिल्लीवाला , युसुफ पठान, समीर शेख , मा.स्वीकृत सदस्य युसुफ शेख ,
बाबा शेख ,नजीर काझी , छबिल पटेल , जहांगीर शेख व अनेक नागरिक उपस्थित होते,
या आंदोलनात सर्व स्थरातील नागरिकांनी पाठिंबा दिला असुन मोठया संख्येने सहभाग घेतला .
या कायद्या विरुध्द देशभरातून विरोध होत असतांना सरकार फक्त बघ्याची भुमिका घेत आहे ,
आणि अश्या कुंभकर्ण रुपी सरकारला जागे करण्यासाठीच संवैधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करून या कायद्याचा निषेध करत आहोत असे मत सर्व सहभागी नीं व्यक्त केले .