एका नगरसेवकाच्या भावा सहित इतरांवर 420 चा गुन्हा दाखल

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

(fraud case filed) 35 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी प्राईड अमन असोसिएट्स  नोंदणीकृत पार्टनर आणि त्यांचे भागीदार हसन अहमद पठाण व आमीनुद्दीन दाऊद शेख, नवाज रफिक शेख यांच्यावर गुन्हा दखल .

(fraud case filed) सजग नागरिक टाइम्स :

पुणे :नाना पेठेतील  एका जागेत झोपडपट्टी नसतानाही झोपडपट्टी असल्याची खोटी माहिती एसआरए प्राधिकरणकडे  सादर करून,

व खोटी कागदपत्रे देऊन एसआरए प्रकल्प मंजूर करून घेत त्याठिकाणी 3 हजार चौरस फूट दुकान देण्याच्या बहाण्याने

एकाची 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Advertisement

याप्रकरणी जाकीर मौला सय्यद (वय 40, रा.सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे.

त्यानुसार प्राईड अमन असोसिएट्स नोंदणीकृत पार्टनर शिप ऑफिस अरोरा टॉवर आणि त्यांचे भागीदार हसन अहमद पठाण व आमीनुद्दीन दाऊद शेख,

नवाज रफिक शेख (वय 33)  यांच्यावर  भादवी कलम 406, 420, 405, 463, 464, 465, 466, 467, 468, 471 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली असून यातील एक जण नगरसेवकाचा भाऊ आहे.

या बद्दल त्या नगरसेवकाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि तो वेगळा राहतो व मी वेगळा राहतो त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही.

Advertisement

काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहणारा माझा लहान भाऊ……यांस वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा असे शब्द का म्हंटले या नगरसेवक साहेबाने.

एक सामाजिक कार्यकर्ता

 2016 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाकीर मौला सय्यद हे सोमवार पेठ येथे राहण्यास आहेत.

तर येतील प्राईड अमन असोसिएट्स ही संस्था असून,नवाज शेख व हसन पठाण हे पार्टनर आहेत. तर आमीनुद्दीन शेख हे आर्किटेक्ट आहेत.

Advertisement

यातील सर्वांनी फिर्यादी यांना भेट घेत नाना पेठेतील सिटीएस नं. 1045 या ठिकाणच्या साईडवर 3 हजार चौरस फूट दुकान देण्याचे आमिष दाखवून ,

त्यांना यासाठी 35 लाख रुपये खर्च येईल असे सांगत पहिले पावणे दोन लाख व नंतर उर्वरीत रक्कम असे एकूण 35 लाख रुपये घेतले.

Advertisement

त्यानंतर फिर्यादी यांनी करारनामा करून देण्यासाठी विनंती केली.

पण, त्यांना करारनामा  करून दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी साईटवर भेट दिली.  

Advertisement

त्यावेळी त्यांना सदरील साईड ही एसआरए अंतर्गत होत असल्याचे समजले.

मग, त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडे या कागदपत्रांची मागणी केली व कागदपत्रे मिळवली.

त्यावेळी सदरील  जागा आरोपी यांनी एका व्यक्तीकडून 3 कोटी रुपयांना भाडेकरूसह विकत घेतली असल्याचे समजले.

जाकीर मौला सय्यद यांनी या इमारतीचा सर्च रिपोर्ट घेतला. त्यात काही भाडेकरू या मिळकतीवर असल्याचे दिसून आले.

Advertisement

त्यांनी मिळकत झोपडपट्टी असल्याचे दर्शवून त्याची एसआरएकडे कागदपत्रे सादर करून पुनर्वसन एसआरए अंतर्गत मंजूर करण्यासाठी व त्याद्वारे मोठा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.

तसेच शेड्युल दोनची यादी तयार करून झोपडपट्टी घोषित केली.

एसआरए प्राधिकरणकडे खोटी माहिती व दस्त देऊन झोपडपट्टी नसतानाही ती झोपडपट्टी आहे,

असे दर्शविले आणि त्याद्वारे एसआरए  प्रकल्प मंजूर करून घेतला व तो फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवला.

Advertisement

जाकीर मौला सय्यद यांना  35 लाख रुपये गुंतवणूक करण्यास लावत त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

अधिक तपास समर्थ पोलीस करीत आहे.

वाचा:Tik Tok Star Beauty khan life story हिंदी में Beauty khan की पूरी जीवनी | Beauty khan Biography

Advertisement
कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल