सजग नागरिक टाइम्स :पुणे:संदेश लाइब्ररीच्या वतीने sant tukaram maharaj ,संत नामदेव महाराज , संत एकनाथ महाराज , संत बहेणाबाई ,
संत तुकडोजी महाराज यांचे अल्लाह आणि नबी (सल्ल .) यांवर रचलेले अभंगाचे समतेचा संदेश देणारे बँनर पालखी मार्गावर सोन्यामारुती चाैक ते पूलगेट पर्यंत लावण्यात आले
वारकरी बंधु आणि भगिनी व स्थानिक नागरिकांनी याला उस्फुर्त प्रतिसाद दिला ….. तसेच शेतकरी बंधूनी आत्महत्या करू नका असा संदेश देण्यात आला .
हे पण वाचा: पालखीतील वारकरी बांधवांचे मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टने केले स्वागत
मोफत आरोग्य शिबीर , नेत्र तपासणी शिबीर औषध वाटप
आषाढी वारीमधील वारकरी बांधवाना भवानी पेठमधील हमाल पंचायत शेजारी श्री सत्ताविसा जैन सिटी ग्रुपच्यावतीने सकाळी नाष्टयाची व्यवस्था करण्यात आली होती .
वारकरी बांधवानसाठी दुपारी मोफत आरोग्य शिबीर , नेत्र तपासणी शिबीर औषध वाटप आदी कार्यक्रम पार पडले .
या कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे यांच्याहस्ते झाले.यावेळी श्री सत्ताविसा जैन सिटी ग्रुपचे अध्यक्ष सोहन ओसवाल ,
सचिव भरत सोळंकी , करण डुमावत , पारस शहा , फुटरमल राणावत , वस्तीमलजी सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी डॉ मुकेश कावेडिया , डॉ संजय ओसवाल , डॉ शरद पटेल , डॉ जिनेश परमार , डॉ रिंकल जैन , डॉ सेजल सिरोहिया आदींनी विशेष परिश्रम घेतले .
भवानी पेठ व्यापारी जैन बंधू समाजाच्यावतीने वारकरी बांधवाना अन्नदान
आषाढी वारीमधील वारकरी बांधवाना भवानी पेठ व्यापारी जैन बंधू समाजाच्यावतीने सात हजार वारकरी बांधवाना अन्नदान नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्याहस्ते करण्यात आले .
यावेळी पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे , माजी नगरसेवक विष्णू हरिहर , नरेंद्र जैन , लालचंद जैन , हितेश खिवंसरा , ताराचंद ओसवाल व जितेंद्र शर्मा आदींनी परिश्रम घेतलॆ .
हे पण पहा:तारक मेहता मधील डॉ हाथी यांचे निधन
आषाढी वारीमधील वारकरी बांधवाना नीता नायकू प्रतिष्ठानतर्फे मोफत दाढी , कटिंग , चप्पल बूट पॉलिश , बॅग दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देण्यात आले.
सह्याद्री सेवा संघातर्फे नारळपाणी , अल्पोपहार करण्यात आले . वुई फॉर ऑल ट्रस्ट व करण फाऊंडेशनच्यावतीने शरबतवाटप,अन्नदान.
महाराष्ट्र टेम्पो संघटना व भवानी पेठ व्यापारी संघटनेच्यावतीने रेनकोट , गुडदाणी , स्टीलचे ताट व ग्लास वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भवानी पेठ विभागातर्फे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले . ताराचंद रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शिबिरासाठी सहकार्य केले.
पालखीतील वारकरी बांधवाना मनजितसिंग विरदी यांच्याहस्ते फळे व पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात आले.शशिकांत म्हेत्रे मित्र परिवाराच्यावतीने अन्नदान करण्यात आले असल्याची माहिती मिळाली .