वाईन शॉपच्या बाहेर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

Social distance : खडक पोलीस मास्क कारवाईत मस्त तर दारु विक्री करणाऱ्यांकडे दुर्लक्ष ?

Social distance : सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :

कोरोना संक्रमणामुळे शासन वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे आखून देत असूनही पुण्यातील काही दारु विक्री करणारे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नसल्याचे दिसत आहे.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत पोलीस आजही रस्त्यावरील वाहने अडवून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहे.

Advertisement

वाचा > नगरसेवक गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून 2 व्हेंटिलेटर

सदरील कारवाई करते वेळी नागरिकात व पोलिसांमध्ये अनेक खटके उडत आहेत . परतू दिलेले टार्गेट पूर्ण करण्यावर पोलीसांनचे लक्ष आहे .

गोरगरीब नागरिकांवर ५०० रूपयाच्या दंडाची कारवाई करण्यापेक्षा दारू गुत्ते ,

Advertisement

वाइन शॉप बाहेर थांबून नियम मोडणा-या या दारुड्यानवर कारवाई सुरु केल्यास वाद कमी महसूल जास्त मिळेल.

सरकारी बाबू गोरगरीब नागरिकांचे खिसे खाली करण्यास पुढे असले तरी दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉपवर कारवाई करण्यास जानून बूजून दुर्लक्ष होत असल्याचेच दिसते .

The fuss of social distinction outside the wine shop

काल (शनिवारी) सायंकाळी पुण्यातील मध्यवर्ती भागातील व खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर शेठ रोडवरील ,

Advertisement

सेव्हन लॉज शेजारील अजंठा वाईन शॉपच्या बाहेर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत दारू विक्री चालू असल्याचे दिसून आले .

तर गंज पेठ पोलीस चौकीच्या समोरच असलेले जीत वाईन शॉप शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उलघंन करत असल्याचे दिसून आले आहे.

विषेश म्हणजे गंज पेठ पोलिस चौकीच्या समोरच दारू खरेदी साठी गर्दी होत असल्याने यावर पोलीसांकडून दुर्लक्ष करण्याचे कारण गुलदस्त्यात आहे.

Advertisement

कोरोना संपवण्यासाठी व रुग्ण कमी करण्यासाठी शासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तर दुसऱ्या ठिकाणी पोलीस वाईन शॉपवर कारवाई करण्यास कुचराई करत असल्यानेच हि गर्दी होत असल्याचे दिसत आहे.

मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारणारे पोलीस नियमांचे उलघंन करणाऱ्यारे दारूडयांवर व वाइन शॉप चालकांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

वाचा > शिवसेनेचे दीपक मारटकरचा खून करणारे जेरबंद

One thought on “वाईन शॉपच्या बाहेर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

Comments are closed.