(Ration shopkeeper) अधिका-यांचे डोळे झाक ? कारवाईची मागणी.
(Ration shopkeeper) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : शासनाने ई पॉस मशिन आणले तरी आज राजरोसपणे रेशनिंगचे धान्य चोरी होत आहे,
धान्याची चोरी होताना देखील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
गोरगरीबांच्या तोंडातील घास हिरावला जात आहे.
अन्नधान्य “ग” परिमंडळ कार्यालयातील लोहियानगर येथील काही दुकानदार नागरिकांना धान्य कमी देऊन यात धान्याची चोरी करून धन्यता मानत आहेत.
वाचा : अखेर पुणेकर व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश : कोरोना निर्बंधात सूट
लोहिया नगर येथील शिधापत्रिका धारक नसिम सत्तार बोजगर ( मशिन क्र.२७२०११३५६०६८ ) यांचे ऑनलाईन ई-पॉस मशिनवर ७ नावे दाखवली जात आहे.
त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेचे २१ किलो गहू व १४ किलो तांदूळ आणि केंद्र शासनाचे २१ किलो गहू व १४ किलो तांदूळ असे एकुण ७० किलो धान्य देणे बंधनकारक असताना
बोजगर यांना फक्त ६ किलो गहू आणि ६ किलो तांदूळ देऊन बोजगर यांची फसवणूक केली जात आहे.
रेशनिंग दुकानदार तब्बल ५८ किलो धान्य स्वताच्या घशात घालत आहे.
एकाचे ५८ किलो तर दिवस भरात हजारो किलो धान्य चोरत असेल ?
तसेच रेशनिंग चोरी उघड होऊ नये म्हणून दुकानदार नागरिकांना पावतीच देण्यास टाळाटाळ करत आहे .
धान्य कमी देण्याचे प्रमाण सध्या पुणे शहरात अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
या दुकानदार विरोधात अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्याची गरज असतानाही अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांना पाठिशी का घालत आहे ?
रोजचे किती रेशनिंग दुकाने तपासल्या जातात व त्यातून किती दुकानदारांवर कारवाई केली जाते याबद्दल वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
नागरिकांना धान्य कमी मिळत असल्या संदर्भात अन्न धान्य “ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की दोन्ही स्कीमचे धान्य मिळून ७० किलो धान्य देणे बंधनकारक आहे,
जर रेशनिंग दुकानदार धान्याची चोरी करत असेल तर निश्चितच कारवाई केली जाईल आणि तो पर्यंत पुरवठा निरीक्षकांना तपासणी करण्यासाठी सांगितले आहे.
वाचा : तलवारीने केक कापून बर्थडे साजरा करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,