ताज्या घडामोडीपुणे

पुरणपोळी दान उपक्रमास मोठा प्रतिसाद

Advertisement

Puran poli : पुरणपोळी दान उपक्रमास मोठा प्रतिसाद

Great response to the puran poli donation program in Holi festival

Puran poli :सजग नागरिक टाइम्स : होळी सणाच्या निमित्ताने शहरातील सोसायटी,मंडळे ,

व नागरिकांना होळीच्या दिवशी पुरणपोळी दान करण्याचे आव्हान करण्यात आले होते.होळी सणाला पुरणपोळीचा नैवेद्य व नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे.

नैवेद्य होळीला अर्पण न करता आम्हाला द्या व त्याचबरोबर एकापेक्षा आधिक कितीही पुरणपोळी दान दिल्यास अंधः गरीब,

अनाथांची होळी सण आनंदात गोड होईल या उदात्त भावनेतून उपक्रम राबविण्यात आल्याचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी सांगितले.

सार्वजनिक मंडळाच्या व सोसायटीच्या होळीच्या ठिकाणी जाऊन 1200 पोळ्या व नैवेद्य गोळा केले

मिळालेल्या पोळ्या ममता अंधः कल्याण केंद्र व आधार अंःध अपंग आनाथश्रमात  येथे जाऊन त्यांना पुरणपोळीचे जेवण दिले.

पुणे शहरांतील मुलींचा जन्मदर वर्षभरात चिंताजनक रीत्या घसरले

त्यांच्या बरोबर सर्व कार्यत्यांनी एकत्र जेवण केले. मुलांनी सांगितले की आम्हाला सर्व काही मिळते.

पण पुरणपोळी मिळत नाही कारण वेळखाऊ असल्याने नागरिक देत नाहीत आज आम्हाला पुरणपोळी मिळाल्याने खुप आनंदी आहोत .

मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही सर्वजण भावनिक झाल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

Advertisement

सर्व नागरिकांना आव्हान केले की वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यासाठी होळी पेटवली जाते असे करतांना नाहक वृक्षतोड केली जाते.

एकीकडे आपण झाडे लावा झाडे जगवा“असा संदेश देतो. तर दुसरीकडे आपणच वृक्षतोड  करतो.जागोजागी होळी न करता एकाच ठिकाणी होळी करुन निरुपयोगी लाकडे,

पालापाचोळा व  प्रतिकात्मक होळी साजरी करुन पर्यावरण पुरक होळी साजरी करण्याचे आव्हान केले.

मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या सदस्यांना आळंदी येथील ज्ञानेशा व विकास रेसिडेंसी  या सोसायटीच्या सभासद यांच्या कडून दशरथ कांबळे,

व धिरज अंबवणे गोविंद सोनी यांनी भरपूर प्रमाणात पोळ्या संकलीत करून दिले .

VIDEO NEWS : Hadapsar येथिल D P रस्त्यावर बांधकाम व्यवसायिकाने बांधले वॉलकंपाऊड

यावेळी अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,

सुर्वणयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष दिपक शहाणे,उपाध्यक्ष संदीप दरेकर, युवक उपाध्यक्ष अक्षय जगदाळे ,

महिला उपाध्यक्षा नूतन शेळके,दशरथ कांबळे ,गजानन धाराशिवकर,काळुराम लांडगे ,प्रदिप गायकवाड,

सा.का रोहित शेळके,पंडीत वनसकर,सतिश ईतापे ,संतोष जाधव,संग्राम तळेकर,ईत्यादी उपस्थित होते.

VIDEO NEWS :चौकास Sanvidhan नाव देण्यास अडथळे आणणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी

Share Now

One thought on “पुरणपोळी दान उपक्रमास मोठा प्रतिसाद

Comments are closed.