हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचारीची दादागिरी

Hadapsar police station news : शुल्लक कारणावरून सामाजिक कार्यकर्त्यास मारहाण

hadapsar police station news

Hadapsar police station news : सजग नागरिक टाइम्स :कोरोनाच्या काळात जिथे देशवासियांनी पोलिसांना त्यांच्या योगदानाबद्दल मान सन्मान दिले त्यांच्या कार्याला सलाम केले .

या कोरोच्याकाळात दिलेल्या योगदानाबद्दल नागरिकांच्या मनात पोलिसांची प्रतिमा अधिक उंचावली गेली

त्याच धर्तीवर काही मोजके अधिकारी व कर्मचारीवर्गाच्या चुकीच्या वागणुकी मुळे या प्रतिमेला तडा जात आहे.

पोलिसांच्या प्रतिमेला तडा जाण्यामागचे कारणही तसेच आहे , हडपसर भाजी मार्केट या ठिकाणी ‘ यश मोबाईल शॉपी‘ या नावाने मोबाईल विक्रीचे दुकान आहे ,

सदरचे दुकान तुषार शंकर आरणे हे मागील १४ वर्षापासून चालवत आहे. तसेच ते समाजसेवेत हि अग्रेसर असतात.

समाजसेवेची आवड असल्याने सध्याच्या कोरोनाच्या कालावधीत तुषार स्थानिक परिसरात अन्नवाटपाचे तसेच लोकांना जनजागृतीचे असे बरेचसे काम करत असतो.

दरम्यान दि. ०७/०६/२०२० रोजी सुमारे रात्री ९ वाजण्याचे सुमारास दिपक ईसावे यांच्या घरात साप निघाल्याकामी त्यांनी संपर्क साधल्यामुळे तेथे त्यांच्या मदतीस तुषार गेले होते,

digital visiting card 70%off banner4999 creat a new websiteCreate your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)Create your website rs 7999 and spread your work _ name around the world at home mk

तेथे साप निघालेला असल्याने स्थानिकांनी मोठया प्रमाणात तेथे गर्दी केली होती.

तसेच तुषार ला हडपसर पोलीसांनी सध्याचे कालावधी पुरते विशेष पोलीस अधिकारी म्हणुन ओळखपत्र दिलेले होते .

त्यामुळे तेथील सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याकामी तुषार पुढे सरसावले होते.

त्याच दरम्यान पोलीस कर्मचारी नितीन मुंडे हा वर नमूद ठिकाणी झिरो पोलीसास दुचाकीवर घेवून आला ,

त्यावेळी नितीन मुंडे याने खाजगी दुचाकीचा वापर केला होता , तसेच त्याने गणवेश देखील परिधान केला नव्हता व त्याच्या गळयात ओळखपत्र देखील नव्हते.

त्यामुळे तुषारला त्यांची ओळख पटणे याचा प्रश्नच उदभवत नव्हता. त्यातच त्यांनी तुषारला तु रे कोण हारामखोर,

जे लोकांना तुझ्या आदेशाचे पालन करायला लावतो, भाडखाव असे म्हणुन तुषारला सर्व लोकांसमक्ष हाताने मारहाण केली त्यावेळेस तुषारने त्याला मी कोण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

असता त्याने तुषारच्या अवघड ठिकाणी जोरात लाथ मारली व घाणघाण शिवीगाळ करून दमदाटी केली ,

तुला दाखवतो मी की, तु कायलायकीचा आहेस तुमच्या सारख्या फालतू आणि लुख्ख्या लोकांना हे असले कार्ड देवून सरकारने आमच्या उरावर बसवले आणि तुम्ही आमच्यावर चढता का

असे घाणेरडे अपशब्द वापरून त्यावेळेस सर्व लोकांसमोर तुषारला त्याच्या हातातील दुचाकीच्या चावीने तुषारला गळयावर ओरखडा मारला व तुषारचा गळा दाबण्याचा प्रयल केला व जोरजोरात लाथाबुक्क्यांनी मारू लागला.

तुषार त्याला सांगण्याचा प्रयत्न करीत होता परंतु त्याने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याच्या वरती ३५३चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

घडलेला प्रक्रार तुषारने वरिष्ट अधिकाऱ्यांच्या कानावर घातला असूनही त्यावर काहीही कारवाई झाली नसल्याने तुषारने याची तक्रार मुख्यमंत्री ,

गृहमंत्री व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण,पुणे पोलीसांना केली आहे.

telegram