रमजान स्पेशल

मानवता आणि कुरआन/Humanity and Qur’an

Advertisement

अल्लाहचा ग्रंथ म्हणून कुरआन शरीफ ओळखला जातो

Read a Humanity and Qur'an  ramzan special artical

जगभरातील सर्व लोकांसाठी तो मार्गदर्शक आहे. रमजान महिन्यात कुरआन शरीफची जास्तीत जास्त तिलावत ( पठन ) करुन तो समजून घेण्याचे कार्य मुस्लिम घराघरातून केले जाते .

मुळात कुरआन शरीफ मधील शिकवण ही माणसाच्या भल्यासाठी आहे .वेगवेगळ्या अध्याय ( पारा )च्या माध्यमातून विविध प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे मार्ग त्यात विशद केले आहेत .

पारा ९ मध्ये अल्लाहने म्हटले आहे कि अल्लाहचीच ईबादत (प्रार्थना ) करा, त्याच्याशिवाय कुणीच माअबूद ( प्रार्थना करण्यास पात्र ) नाही .

मोजमाप खरं ठेवा. लोकांच्या वस्तू हडप करु नका. जमिनी वर सुधारणेचे कार्य करा . तेढ वाढवू नका . लोकांच्या मनात भिती निर्माण करु नका .

मानवता आणि कुरआन/Humanity and Qur’an

अल्लाहच्या मार्गापासून कुणाला रोखू नका . अल्लाहच्या उपकारांची जाण ठेवा.अराजकता निर्माण करणारांचा अंजाम नीट होत नाही .

त्यांच्या वाईट अंतापासून बोध घ्या . धर्माचे वैरी तुम्हाला धर्मकार्यापासून रोखायचे काम करतील त्या वेळी त्यांच्या आमिषांना बळी पडू नका .

सत्यमार्गाला कधी सोडू नका . अल्लाह वर विश्वास ठेवा. त्यालाच मदत मागा . लोक तुम्हाला वेगवेगळी आमिषे दाखवतील . त्या आमिषांना बळी पडू नका .

विरोधक तुमचे वाईट चिंतन करतील , तुम्ही त्यांचे चांगले चिंतन करा . तंगी आणि संकटकाळात अल्लाह कडे ध्यान लावा .

Read a Humanity and Qur'an ramzan special artical
join us

परिस्थिती सुधारली तरी त्याची आठवण ठेवा . ईमानदारीमध्ये फरक करु नका . अल्लाहच्या नाराजी पासून सतर्क रहा .

त्याच्यापासून कधीही दूर होऊ नका . तो जमिन व आकाशातील बरकतची द्वारे उघडील . मागील लोक  अल्लाहशी केलेले वायदे विसरले .

चुकिच्या वाईट मार्गांचा अंगीकार त्यांनी केला . अल्लाहची शिकवण नाकारली त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. तुम्ही अशा मार्गांपासून दूर रहा .

Advertisement

हेपण वाचा :(Ramzan)रमजान महिन्याचा पूर्वार्ध जवळपास पूर्ण होत आला आहे.

अल्लाहला आपला दाता समजून त्याची प्रार्थना करा. त्याच्याकडून कृपा आणि माफी मागा . दुनियेची भलाई मागा आणि आखेरत ची देखील भलाई मागा .

अल्लाहची कृपा त्यांच्यावर होते जे त्याच्या नाराजी पासून दूर राहतात . जकात आदा करतात व त्याच्या आयातीवर श्रध्दा ठेवतात .पैगंबरांच्या आदेशाचे पालन करा .

ते चांगल्या बाबी सांगतात व वाईटापासून रोखतात . हलाल आणि हरामाचा फरक ते दाखवून देतात . त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांचे कार्य सुरु ठेवा .

Read a Humanity and Qur'an' ramzan special artical

तुमच्या मध्ये जे लोक चुकिचा मार्ग अवलंबतील त्यांची समजूत घाला . त्यांचा हट्ट पाहून नाराज होऊ नका . त्यांचे प्रबोधन करीत रहा .

तुम्हाला अल्लाहची किताब दिली आहे. तिचा पूर्ण हक्क आदा करा . अल्लाहशी खोटया अपेक्षा ठेऊन या दुनियेच्या रंगरंगिनी मध्ये लीन होऊ नका .

लक्षात ठेवा आखेरत या दुनियेपेक्षा खूप श्रेष्ठ व सुंदर आहे. मात्र ती त्या लोकांसाठी आहे जे अल्लाहच्या नाराजी पासून दूर राहतात .

त्याच्या ग्रंथावर कायम राहतात. नमाज कायम करतात व नेहमी सत्कार्य करतात . 

अशा प्रकारे दैनंदिन जीवनात रोज घडणाऱ्या घटना व प्रसंगी आपण कोणती भूमिका घेतली पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन कुरआन शरीफ च्या वेगवेगळ्या भागातून अल्लाहने केले आहे .

जगातील प्रत्येक व्यक्ति साठी कुरआन मार्गदर्शक असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यात दाखवलेल्या मार्गांचा अवलंब केल्यास जगातील प्रत्येक व्यक्तिचे जीवन सुजलाम सुफलाम होईल.

चांगल्याचे अनुकरण व पालन तसेच वाईटाचे क्षालन ही भूमिका स्विकारुन प्रत्येकाने जीवन जगल्यास जगातून वाईट गोष्टी नामशेष होतील . त्यासाठी प्रत्येकाने निश्चय करण्याची गरज आहे ( क्रमशः )

Salimkhan pathan:9226408082

humanity-and-quran-ramzan-special-artical/
Share Now

2 thoughts on “मानवता आणि कुरआन/Humanity and Qur’an

Leave a Reply