ब्रेकिंग न्यूज

शफि इनामदाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश

Advertisement

Ideal Education Trust संचालक शफि इनामदार विरोधात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश

सजग नागरिक टाइम्स: पुणे, हडपसर गुलामअलीनगर मधील Ideal Education Trustच्या शाळेतील अनेक अनागोंदी कारभार बाहेर काढल्याने पुण्यातील लोकहित फाऊंडेशन पुणे या संस्थेची आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे  संचालक शफि यासीन इनामदार ने बदनामी सुरू केली.

त्याची कुणकुण अजहर खान यांना लागता अधिक माहिती घेतली असता शफि यासीन इनामदार ने पोलीस स्टेशन, शिक्षण मंडळ, जिल्हा परिषद, व इतर ठिकाणी खोट्या व बदनामीकारक पत्रव्यवहार केल्याचे निदर्शनास आले .

त्याची दखल घेत अजहर खान यांनी शफि इनामदार ला अॅड वाजिद खान बिडकर यांच्या मार्फत नोटिस बजावून खुलासा मागितला होता .

Advertisement

परंतु शफि इनामदारने खुलासा न दिल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर कोर्टात अब्रूनुकसानीचा(मानहानीचा) दावा दाखल करण्यात आला.

लष्कर कोर्टात सर्व कागदपत्रे सादर केल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व कागदपत्रे तपासुन शफि यासीन इनामदार विरोधात सीआरपीसी 202च्या कलमा अंतर्गत चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे वानवडी  पोलीसांना आदेश देण्यात आले आहे. 
  विडिओ बातमी पहाण्यासाठी क्लिक करा         

कोणाच्या विरोधात खोट्या तक्रारी करणे सोपे असते परंतु दिलेली खोटी तक्रार सिध्द नाही केल्यास तक्रारदारास गंभीर परिणाम भोगावे लागतात म्हणून खोट्या तक्रारी करताना शंभर वेळा विचार केलेलाच बरा. 
                  अॅड वाजिद खान बिडकर 

माझ्या विरोधात खोट्या तक्रारी करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे तसेच न्यायालयातून नक्किच न्याय मिळेल अशी आशा आहे .
अजहर अहमद खान :संस्थापक अध्यक्ष लोकहित फाऊंडेशन पुणे

Share Now