Homeताज्या घडामोडी(Ramzan)रमजान महिन्याचा पूर्वार्ध जवळपास पूर्ण होत आला आहे.

(Ramzan)रमजान महिन्याचा पूर्वार्ध जवळपास पूर्ण होत आला आहे.

(Ramzan)रमजान महिन्याचा पूर्वार्ध जवळपास पूर्ण होत आला आहे.

importance-of-ramzan-month-and-allahs-order/

कडक उन्हाळ्यात देखील अल्लाहचे नेक बंदे रोजे करीत आहेत. नमाज पठण, तिलावत ए कुरआन,

तरावीहची नमाज आदी सर्व क्रिया अल्लाहच्या आदेशाप्रमाणे करीत आहेत.

प्रचंड उकाडा असताना देखील आता रोजे पूर्ण होत आहेत. आता जणू सवय झाली आहे.

कोणताही त्रास सहन करण्याची शक्ती शरीरात निर्माण झाली आहे.

whatsapp.gif

एखादा आदेश पाळण्याचे ठरवल्यास तो पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी असावी लागते.

तीच तयारी रमजान (Ramzan)महिन्यात होत असते. शासनाच्या कायद्याचे पालन भीतीपोटी होत असते.

आपण जर नियमानुसार वागलो नाही तर आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित होऊ शकते

या भीतीने आपण शासनाच्या नियमाचे पालन करीत असतो. मनाच्या विरुद्ध सुद्धा वागत असतो.

अल्लाहचे आदेशाचे पालन करताना दुनियादारीची भीती न बाळगता आपल्याला निकाल प्राप्त होणार आहे.

importance-of-ramzan-month-and-allahs-order/

तो नेकीचा असावा या एकाच हेतूने आपण जीवन जगत असतो. अल्लाहने फर्मान जारी केले की, दिवसातून पाच वेळा नमाज पठण करा,

Ramzan महिन्याचे रोजे पूर्ण करा, दानधर्म करा, कुरआनशरीफ चे वारंवार वाचन करा व त्याप्रमाणे वर्तन करा.

तुमच्या प्रत्येक कृत्याचे लेखन केले जात असून संपूर्ण जीवनाच्या कार्याचे ऑडिट आखेरतमध्ये केले जाणार आहे .

त्यानुसार तुमचा आडिट वर्ग निश्चित केला जाणार आहे .त्यासाठी आपले वर्तन शुध्द , सचोटीचे असले पाहिजे .

इस्लाम धर्माने जगाला एक आदर्श जीवन प्रणाली दिली आहे . तिचा स्विकार करुन जगभरातील लोक सुखी झाले आहेत.

ज्यांनी ही प्रणाली अंगिकारली नाही त्यांचे जीवन बरबाद झाले आहे . सत्यता , शांतता, प्रामाणिकपणा ,

खंबीरता, अल्लाहची भिती ही सामान्यत : इस्लामी जीवन पध्दतीची प्रमुख अंगे आहेत.आपल्यामुळे कुणालाही त्रास होता कामा नये ,

शांततेने जगावे व इतरांनाही जगू दयावे , नेहमी सत्याचा स्विकार करावा , सचोटीने व्यवहार करुन जीवन जगावे,

https://sajagnagrikktimes.com/importance-of-ramzan-month-and-allahs-order/

आपले विचार खंबीर असावे , त्यात दुतोटीपणा नसावा . कुणाची फसवणूक करु नये . अल्लाह सर्व काही जाणतो आहे.

तुम्ही कितीही अंधारात व्यवहार केले तरी तो सर्वज्ञात आहे . प्रामाणिकपणे व्यवहार करा , ग्राहकांची फसवणूक करू नका ,

खोटी प्रतिष्ठा मिळविण्याचा खटाटोप करु नका , सत्ता , संपत्तीचा हव्यास करु नका .सूद ( व्याज ) चे व्यवहार करू नका .

कुणाचीही निंदानालस्ती , बदनामी करु नका. कुणाचे काही गुपित तुम्हाला माहिती असल्यास त्याची चर्चा करु नका . त्यावर पडदा टाका .

अशी शिकवण अल्लाहने कुरआन शरीफ च्या माध्यमातून हजरत पैगंबरांमार्फत लोकांना दिली आहे .

कुणाचा माल हडप करु नका .यतीम( अनाथ ) ,विधवा यांचे हक्क हिरावून घेऊ नका ,

हेपण वाचा :मानवता आणि कुरआन/Humanity and Qur’an

स्त्रियांकडे वाईट दृष्टीने पाहू नका , एकांतात त्यांना भेटू नका , एकमेकाविषयी गैरसमज पसरवू नका, द्वेष पूर्ण व्यवहार टाळा ,

कुणाचे हक्क हिराऊन घेऊ नका अशी शिकवण कुरआन मध्ये अल्लाहने दिली आहे.

या शिकवणी प्रमाणे जो जीवन व्यतित करील त्याला त्याचा निकाल त्याच्या अपेक्षेप्रमाणे आखेरतमध्ये मिळणार आहे.

आपल्याला जर वाटत असेल कि आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागावा तर अल्लाहच्या अपेक्षेप्रमाणे आपणही वागले पाहिजे ना .( क्रमशः ) सलीमखान पठाण 9226408082

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular