investigation Kondhawa construction:कोंढव्यातील बोगस गुंठेवारी बांधकामांची चौकशी करा -अॅड.समीर शेख
पुणे :पुण्यात कोंढवा भागात इमारतीची सीमा भिंत कोसळून सतरा जणांचा बळी गेला,हि घटना गंभीर असून ज्या इमारतीचे बांधकाम चालू होते त्या इमारतीला बांधकाम परवाना होता का याची सर्वप्रथम चौकशी(investigation Kondhawa construction) झाली पाहिजे.
कोंढव्यातील बोगस गुंठेवारीच्या सर्व बांधकामांची चौकशी झाली पाहिजे ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे प्रदेश सचिव अॅड . समीर शेख यांनी पत्रकाद्वारे केली आहे .
बिल्डिंग 2019 साली बांधायची आणि 2007 सालचा बांधकाम पुर्ण झाल्याचा “गुंठेवारी” दाखला लावायचा अशी बोगस गुंठेवारी केलेली बांधकामे कोंढवा येथे सर्वत्र आहेत.
ज्या इमारतींच्या पाया खोदाईची कामे सुरु आहेत , अशांकडे देखील चक्क 2007 किंवा 2008 चा बांधकाम पुर्ण झाल्याचा दाखला असू शकतो किंबहुना असतोच,असा आरोप एड . शेख यांनी केला आहे .
पार्किंगच्या जागेत दुकाने बनवून विकल्याने पार्किंगला जागाच नाही, अनेक भागात अग्निशामक दलाची वाहने देखील जाउ शकत नाहीत..
दोन चार गुंठ्यात पाच सहा मजले ठोकून टोलेजंग इमारती उभ्या आहेत पण पार्किंगला जागा नाही,अशी परिस्थिती या भागात आहे .
अनेक लोकांनी या पूर्वी या विषयाला हात घालायचे टाळले आहे. पण कुठवर आणि किती बळी देऊन या गडगंज असलेल्या मोठ्या लोकांच्या तिजोऱ्या भरायच्या? असा प्रश्नही त्यांनी पत्रकात विचारला आहे .